शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत फसवणुकीच्या तक्रारीतही महिलेची फसवणूक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 9, 2024 18:30 IST

खारघर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेला बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा मॅसेज आला होता.

नवी मुंबई : ऑनलाईन फसवणुकीची ऑनलाईन तक्रार करतानाही महिलेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिलेच्या खात्यातून २० लाख रुपये उडवण्यात आले आहेत. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. 

खारघर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेला बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा मॅसेज आला होता. यावेळी महिलेने संबंधितांना टेलिग्रामवर संपर्क साधला असता ३ हजार रुपये गुंतवून ३० हजार रुपये कमवण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून महिलेने ३ हजार रुपये भरले होते. मात्र नफ्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फसवणूक करणाऱ्या विजय बिटकॉइन ट्रेडिंग कंपनी विरोधात तक्रार करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यामध्ये एक नंबर मिळाला असता त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. यावेळी फोनवरील व्यक्तीने त्यांना मोबाईलमध्ये अव्वल डेस्क ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून बँकेचे ऍप्लिकेशन वापरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने बँकेचे ऍप्लिकेशन सुरु ठेवले असता फोनवरील व्यक्तीने परस्पर ऍप्लिकेशनचा अधिकार मिळवून खात्यातून २० लाख रक्कम काढून घेतले. यादरम्यान बँकेतून पैसे काढून घेतले जात असल्याचे सांगण्यासाठी त्यांना बँकेतून फोन येत असतानाही त्यांनी तो टाळल्याने गुन्हेगाराचा उद्देश साध्य झाला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी