शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पणानंतरही समाजमंदिर वापराविना; भोगवटा प्रमाणपत्र नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 00:27 IST

सिडकोच्या वेळकाढू धोरणाचा कामोठेतील नागरिकांकडून निषेध

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कामोठे सेक्टर २१ मध्ये सिडकोने समाजमंदिर बांधले आहे. या समाजमंदिराचे लोकार्पण विधानसभा निवडणुकी आधीच, सप्टेंबर महिन्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. इमारत बांधून दोन वर्षे झाली तरी समाजमंदिर कामोठेकरांसाठी खुले करण्यात आलेले नाही. नवीन वर्षात तरी समाजमंदिर वापरासाठी खुले करण्यात यावे, यासाठी एकता सामाजिक संस्थेकडून सिडको अधिकाऱ्यांना निवेदनासह तीळगूळ वाटप करण्यात आले आहे.

कामोठे वसाहतीत सेक्टर २१ येथे समाजमंदिराकरिता सिडकोने मोकळा भूखंड ठेवला होता. तो कित्येक वर्षे तसाच पडून होता. स्थानिक रहिवासी तसेच एकता सामाजिक संस्थेकडून केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोने या जागेवर २०१८ मध्ये समाजमंदिर बांधले. दोन मजली इमारतीत तळमजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे. तर पहिल्या मजल्यावर अभ्यासिका, वाचनालय बांधण्यात आले. याशिवाय दुसºया माळ्यावर सभागृह आणि ओपन टेरेस आहे. इमारतीचे बांधकाम तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले असले तरी अद्याप समाजमंदिराला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ही वास्तू नागरिकांसाठी खुली केली नसल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे.

वाढत्या लोकवस्तीचा विचार करता वसाहतीत समाजमंदिराची आवश्यकता आहे. मात्र, सिडकोकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांच्या दालनात यासंदर्भात जवळपास आठ महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात येऊन १५ दिवसांत समाजमंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप समाजमंदिर वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. याचा निषेध नोंदवत बुधवारी, मकर संक्रांतीच्या औचित्याने, समाजमंदिर खुले व्हावे, यासाठी एकता सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कामोठेतील सिडको अधिकाऱ्यांना निवेदनासह तीळगुळाचे वाटप करत अनोखे आंदोलन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, मंगेश अढाव, सुनील करपे आदी उपस्थित होते.

समाजमंदिर बांधून दोन वर्षे झाली ही वस्तुस्थिती आहे. इमारतीचे लोकार्पण झाले आहे; पण भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे ते नागरिकांकरिता खुले करण्यात आले नाही. या बाबत वरिष्ठांशी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कामोठेकरांसाठी समाजमंदिर खुले करण्यात येईल. - विलास बनकर, कार्यकारी अभियंता, सिडको

टॅग्स :cidcoसिडको