शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

सिडकोच्या नैना प्रकल्पाचे पंख छाटले, एमएमआरडीएकडे ८० गावे

By कमलाकर कांबळे | Updated: November 10, 2023 09:05 IST

राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्याच्या अंतरिम विकास आराखड्यालाही २७ एप्रिल २०१७ रोजी मंजुरी दिली.

नवी मुंबई : नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ पैकी  ८० गावे वगळण्यात आली आहेत. वगळलेल्या गावांचा आता एमएमआरडीए विकास करणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने हा निर्णय घेतला असून, बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नैना क्षेत्र फक्त ९५ गावांपुरते मर्यादित झाले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७० गावांचे सुमारे ५६० किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्र म्हणून अधिसूचित करून विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. मात्र, दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही गावे नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केली. तर काही गावांचा समावेश पनवेल महापालिकेत केला. त्यामुळे नैनाचे क्षेत्र २२४ गावांपुरते मर्यादित राहिले. यापैकी सिडकोने पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करून विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला.

आराखड्याला मंजुरीराज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्याच्या अंतरिम विकास आराखड्यालाही २७ एप्रिल २०१७ रोजी मंजुरी दिली. उर्वरित २०१ गावांच्या विकास आराखड्यालासुद्धा १६ सप्टेंबर २०१९ रोजी मंजुरी मिळाली. 

२०१ गावांतून ४९ गावे वगळलीदुसऱ्या टप्प्यातील मूळ २०१ गावांतून ४९ गावे वगळली आहेत. खालापूर तालुक्यातील ३५ आणि ठाणे तालुक्यातील १४ अशी वगळलेल्या गावांची आकडेवारी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता केवळ १५२ गावे शिल्लक राहिली आहेत. पहिल्या टप्प्यातील २३ आणि दुसऱ्या टप्प्यातील १५२ अशा एकूण १७५ गावांच्या विकासासाठी  सिडकोने कंबर कसली आहे. मात्र, यातच शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळून आता ती एमएमआरडीएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :cidcoसिडको