शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:24 IST

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.

नवी मुंबई : कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे. घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून पोलिसांनी २८४ दाम्पत्यांना सुखी संसाराचा कानमंत्र दिला आहे. अशा दाम्पत्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या नेरुळमध्ये उपस्थित होत्या.गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षामार्फत गतवर्षात २८४ संसारांचा काडीमोड थांबवला आहे. पती-पत्नीमधील वादाच्या प्राप्त तक्रारीवरून त्यांचे समुपदेशन करून गैरसमज दूर केले आहेत. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरीलही ताण कमी झाला आहे. त्यानुसार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नव्याने सुखाचा संसार थाटणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेरुळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती नीलम गोºहे, पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाणे, अशोक दुधे, सुरेश लोखंडे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी नीलम गोºहे यांनी पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या आईवडिलांप्रमाणेच पती-पत्नीच्या आईवडिलांचाही सन्मान केल्यास बरेच कौटुंबिकवाद मिटतील, असा उपस्थितांना सल्ला दिला. मात्र, जे दाम्पत्य काही केल्या एकत्र होण्याच्या मन:स्थितीत नसतात त्यांच्या वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याची भावनाव्यक्त केली.अशा अनेक दाम्पत्यांचे खटले पोटगी, हुंडाबळी, मुलांची कस्टडी यासह विविध कायद्यांतर्गत एकाच वेळी वेगवेगळ्या कोर्टात चालतात. यामध्ये निकाल लागण्यास होणाºया विलंबाचा मनस्ताप पती-पत्नीसह त्यांच्या मुलांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे असे विविध खटले एकत्र चालवले जावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोºहे म्हणाल्या. तर घटस्फोटाच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्यांच्या मुलांना मानसिक आधार देण्यासाठीचाही आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही बदलत्या कुटुंब व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. हल्ली प्रत्येक पती-पत्नीला एकमेकांपासून ‘स्पेस’ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, दोघांनाही हा स्पेस नेमका हवा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लग्नानंतर सामंजस्याने राहायचे आणि संसार टिकवायचे दोघांवरही अवलंबून असते. त्यामुळे संबंध तुटण्यापूर्वीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा तुटलेले संबंध जोडल्यानंतरही त्याच्या गाठी आयुष्यभर राहतात, असा सल्लाही त्यांनी दिला.अल्पवयीन मुला-मुलींकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असताना पालकांचे त्यांच्यावर नियंत्रण हवे. अन्यथा त्यांचे तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सदैव सर्तक राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे