शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 05:33 IST

बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख  किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते. 

नवी मुंबई : स्वत:च्या तुंबड्या भरणारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. आमच्या नेत्यावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा नरेश म्हस्के यांनी नाव न घेता वनमंत्री गणेश नाईक यांना दिला. महापालिकेची निवडणूक सन्मानाची असून, महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख  किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते.  नाईक यांच्याकडून  एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात असल्याने कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे, हा संदेश देण्यासाठीच आल्याचे त्यांनी सांगितले.

“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका

महायुतीत निवडणूक लढवण्याची आमची इच्छा

महायुती म्हणून निवडणुका लढण्याची इच्छा आहे. भाजप व आमच्यामध्ये काहीही दुरावा नाही. येथे भाजपमध्येच अंतर्गत दुरावा आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यात सत्ता आली व पुन्हा निवडणुकीतही सत्ता मिळाली. नाहीतर, काही जण जंगलात जाऊन बसले होते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात आल्याचेही नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

आपली कामे जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचे आवाहन

टीका करणारांनी थोडा वेळ नवी मुंबईच्या विकासासाठी दिला असता तर बरे झाले असते. आमच्या नेत्यांनी स्वत:च्या घराण्याचा विचार न करता संपूर्ण नवी मुंबईचा विचार करून निर्णय घेतला आहे. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपनेते विजय नाहटा, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, सुरेश कुलकर्णी, अविनाश लाड, अशोक गावडे, विजय माने, वैभव गायकवाड, सरोज पाटील, सुशील यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केEknath Shindeएकनाथ शिंदे