शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

MIDC ने SRA राबविल्यास वनमंत्रिपद सोडून रस्त्यावर उतरणार; मंत्री नाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:47 IST

टीटीसीतील झोपडपट्ट्या पुनर्वसनबाबतचे वृत्त; ‘टीटीसी पुनर्वसन’ तापले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील अर्थात टीसीसीतील ३८,८०० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी तीन पॉकेटमध्ये ‘एसआरए’ प्रकल्प राबविण्याच्या एमआयडीसीच्या निर्णयाविरोधात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक मैदानात उतरले आहेत. एमआयडीसीने एसआरए राबविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर मंत्रिपद सोडून थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी गुरुवारी वाशी येथे जनता दरबारात दिला.

महापालिकेचा विकास आराखडा २०१८-३८ मध्ये नवी मुंबईतील टीटीसी एमआयडीसीसह सिडको आणि महसूल विभागाच्या  जागेवरील झोपड्यांची संख्या २००१ मध्ये ४८,८०५ तर २०११ मध्ये ६७,३२७ दाखविली आहे. परंतु, एमआयडीसीने २००१ पर्यंतच्या ३८,८०० झोपड्या नव्या घरासाठी पात्र ठरवल्या आहेत. ही संख्या किती तरी पटीने वाढली आहे. यामुळे उर्वरित २८,५२७ झोपड्यांचे काय, या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या शहरातील झोपडपट्टीवासीयांनी एकत्र येऊन बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

‘लोकमत’चा पाठपुरावा

एमआयडीसीच्या एसआरए योजना राबविण्याच्या निर्णयामुळे झोपडपट्टीवासीयांतील असंतोष, त्यांच्या मागण्या, महापालिकेवर पडणारा  आर्थिक भार, शहराचे कोलमडणारे नियोजन, होणारी आर्थिक उलाढाल अशा विविध पैलूंवर लाेकमतने लेखमालेच्या माध्यमातून  प्रकाश टाकला. यानंतर एमआयडीसीच्या या निर्णयाला आपला विरोध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांची  भेट घेणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले होते. परंतु, त्यांनी थेट वनमंत्रिपद सोडून झोपडपट्टीवासीयांसह सिडकाेच्या जागेवर बांधलेल्या २०११ पर्यंतच्या बांधकामधारकांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

टीटीसीतील झोपडपट्ट्या पुनर्वसनबाबतचे वृत्त

महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील २०११ पर्यंतची १५०० चौरस फुटांपर्यंतची सर्व  बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खास शासन निर्णय काढून  १५०० चौरस फुटांपर्यंतची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेताना ५०० चौरस फुटांसाठी कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे स्पष्ट केले  आहे. हा निर्णय एमआयडीसीसह सिडकोलाही लागू आहे. यामुळे एमआयडीसीसह सिडकोने २०११ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना  हात लावू नये. मात्र, शासन निर्णयाच्या दोन दिवस आधीच एमआयडीसीने टीटीसीतील ३८,८०० झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी तीन पाॅकेटमध्ये निविदा काढल्या आहेत. त्या त्वरित थांबवाव्यात. ती मागणी मान्य न केल्यास वनमंत्रिपद सोडून थेट रस्त्यावर उतरू.गणेश नाईक, वनमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Naik warns to resign if MIDC implements SRA for slums.

Web Summary : Forest Minister Ganesh Naik opposes MIDC's SRA plan for 38,800 TTC slum dwellers. He threatens resignation and protests if MIDC proceeds, demanding regularization of structures until 2011.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकMIDCएमआयडीसीSlum Rehabilitation Authorityझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण