शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची काळजी घेतली पाहिजे - वझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 03:23 IST

मुंबईतील पर्यावरणाचा ºहास होत आहे. त्यामुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना वाढत आहेत. ते आपल्या भक्षाच्या शोधात फिरत आहेत.

कुलदीप घायवट मुंबई : मुंबईतील पर्यावरणाचा ºहास होत आहे. त्यामुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना वाढत आहेत. ते आपल्या भक्षाच्या शोधात फिरत आहेत. मात्र, जंगले वाचविली, तर वन्य प्राणीही वस्तीत घुसणार नाहीत. आपण पुढाकार घेऊन प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना योग्य वातावरण, योग्य ठिकाणे यांची व्यवस्था केली पाहिजे, असे मत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘अर्जुन’ नावाच्या बिबट्याला मागील चार वर्षांपासून दत्तक घेणाऱ्या साधना वझे यांनी व्यक्त केले. ‘लोेकमत’ने ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला.

देखभालीविषयी काय सांगाल?प्राणिप्रेम, समाजकार्य करण्याची जाणीव असल्याने ‘अर्जुन’ बिबट्याला मागील चार वर्षांपासून दत्तक घेत आहे. एका वर्षासाठी १ लाख २० हजार रक्कम खर्चून चार वर्षांपूर्वी अर्जुनला दत्तक घेतले. त्याचा सांभाळ नॅशनल पार्कमध्ये योग्यरीत्या केला जात आहे. तेथील सर्व कर्मचारी, अधिकारी बिबट्याचा योग्यरीत्या सांभाळ करत असतात. याच कारणास्तव अर्जुन आजारी पडल्याची घटना घडलेली नाही; ही कौतुकास्पद बाब आहे.अर्जुनबद्दल कशी माहिती मिळाली?ताडोबा, कान्हा या अभयारण्यात फिरल्याने तेथे अनेक वन्य प्राणी पाहिले. चार वर्षांपूवी सहजच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर दत्तक योजनेबद्दल माहिती मिळाली. तेव्हा लगेच अर्जुन बिबट्याला दत्तक घेतले. मागील चार वर्षांपासून या बिबट्याला दत्तक घेत आहे. जोपर्यंत अर्जुन बिबट्या आहे किंवा जोपर्यंत मी असणार तोपर्यंत बिबट्याला दत्तक घेत राहणार.

प्राण्यांविषयी जिव्हाळा कसा निर्माण झाला?बालपण आणि शिक्षण विलेपार्लेत झाले. पार्ले टिळक विद्यालय (आताचे साठ्ये महाविद्यालय) येथे मी शिकले. घरात पाळीव प्राणी असल्याने प्राण्यांची ओढ होतीच. प्राण्यांमध्ये आपुलकी, जिव्हाळा खूप असतो. त्यामुळे त्यांच्याशी खूप घट्ट नाते तयार होते.

सामाजिक कार्याबाबत काय सांगाल?रोटरी क्लब, मराठी विज्ञान परिषद यांसारख्या संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. ब्रेल लिपीतील आतापर्यंत ६० पुस्तके प्रकाशित केली आहेत. अनेक लेखकांची वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिली आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईforestजंगल