शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न

By नारायण जाधव | Updated: December 16, 2022 07:29 IST

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत.

- नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जगातील विविध देशांनी स्थापन केलेल्या जी-२० परिषदेच्या २०२२-२३ या वर्षांचे यजमानपद भारताकडे आल्यानंतर तिच्या बैठकांचा प्रारंभ मुंबईत झाला. यात मुंबईसह पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.  मात्र, नवी मुंबईत जी-२० ची बैठक सोडाच; पण प्रतिनिधींची साधी भेट ठेवलेली नाही. यावरून शहरवासीयांत नाराजी आहे. जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची बैठक नाही किमान नवी मुंबई शहरात भेट ठेवावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. वास्तविक, नवी मुंबई शहर देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानात सातत्याने पहिल्या दहामध्ये येणारे राज्यातील एकमेव सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. 

प्रतिनिधींच्या भेटीसाठी सरकारला करणार विनंतीआशिया खंडातील सर्वात मोठी टीटीसी औद्योगिक वसाहत, रिलायन्स समूहाचा पसारा, केंद्र सरकारचे वाशी स्थानकातील इन्फोटेक पार्क, महाराष्ट्र सरकारचे  एमआयडीसीतील मिलेनियम बिझनेस पार्क, सिडकोने बांधलेली देखणी रेल्वेस्थानके दाखविता येतील. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कसे चालते, ती महामुंंबईतील तीन ते चार कोटी लोकांची भूक कशी भागविते, हे जी-२० समूहाला दाखविण्यासाठी प्रतिनिधींच्या भेटी नवी मुंबईत व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती करू, असे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले.

n जेएनपीटी बंदर, वेगाने आकार घेत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, परिसरातील लॉजिस्टिक पार्क, मेडिकल व अभियांत्रिक शिक्षण संस्थाचे जाळे जी-२० समूहाला दाखविण्याची संधी असल्याचे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या.n मुंबई हे जुने शहर आहे. पण नवी मुंबई हे नवे अत्याधुनिक शहर आहे. आता नैना विकसित होत आहे. n शहरातील लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करून नवी मुंबईला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना महाराष्ट्रचे महासचिव प्रकाश बाविस्कर म्हणाले.