शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

रेमडेसिविरला डॉक्टरांचा आग्रह कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:53 IST

निधी चौधरी : डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेला जागण्याची वेळ

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोनासाठी रामबाण औषध नाही. तरीदेखील खासगी, सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर या इंजेक्शनचा वापर कोविड रुग्णांवर करीत आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) तसेच राज्यातील कोविड आजारावर मात करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने स्पष्ट सांगितले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एक नवीन संकट निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी डॉक्टरांची कानउघाडणी करीत डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेला जागून गरज नसताना रेमडेसिविरचा वापर टाळण्याचे डॉक्टरांना व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे.टास्क फोर्सने म्हटल्यावर रुग्ण ऑक्सिजनवर असतानाच त्याच्यावर रेमडेसिविरचा वापर करावा. तसेच कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पाच दिवसांच्या कालावधीत इंजेक्शनचा वापर प्रभावी ठरू शकतो. मात्र, असे असताना प्रत्येक रुग्णासाठी हे इंजेक्शन सुचविणे, हे चुकीचे आहे. ही बाब डॉक्टरांना माहिती असल्याने रुग्णांसाठी इतर पर्यायी औषधांचा वापर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी डॉक्टरांना केलेल्या आवाहनात स्पष्टपणे म्हटले आहे. मागणी वाढल्याने सध्याच्या घडीला रेमडेसिविर इंजेक्शचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे त्याचा काळा बाजार वाढल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी डॉक्टरांना दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.

नातेवाइकांची धावपळ थांबवावीnवैद्यकीय क्षेत्रात आल्यावर डॉक्टर घेत असलेली शपथ म्हणजेच डू नो हार्म म्हणजेच (कोणतीही इजा होऊ देणार नाही) मात्र असे असतानादेखील गरज नसताना इंजेक्शनची मागणी केली जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.nजागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच टास्क फोर्सने कोरोनावर सुचविलेल्या औषधोपचारांचा वापर करून गरज नसताना रेमडेसिविर प्रत्येक रुग्णासाठी सुचवून रुग्णांच्या नातेवाईकांची चाललेली धावपळ थांबविणे डॉक्टरांच्या हातात आहे.