शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणूक : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात उत्साह; आता निकालाबाबत उत्सुकता

हणमंत पाटीलपिंपरी : मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत २ टक्क्याने घसरला आहे. साधारण शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला असून, ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह चांगला होता. त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.

राज्यातील चौथ्या टप्प्यात मुंबई, उत्तर महाराष्ट्रासह शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुका सोमवारी झाल्या. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरली आहे. मावळ मतदारसंघाच्या रचनेत घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा, तसेच घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघ आहेत. सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन भाजपा, दोन शिवसेना व एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना युतीची ताकद अधिक आहे. मात्र, राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चुरशीची लढत दिली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत उरण, कर्जत व मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का ६०.११ टक्के झाला होता. यंदा मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात चुरस असूनही मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला आहे. साधारण सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का ५८.२१ होता. यामध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये ६१.८० टक्के आणि मावळ मतदारसंघात ६१.२८ टक्के झालेले आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदानाची टक्केवारी गतपंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत ८ ते १० टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, घाटावर पिंपरी व चिंचवड मतदारसंघात दोन ते तीन टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे.

गतपंचवार्षिक निवडणुकीत घाटाखाली उरण मतदारसंघात ७१.८४ टक्के, कर्जत ६८.३८ टक्के आणि पनवेल ५८.४८ अशी मतदानाची टक्केवारी होती. येथील वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शिवसेनाविरोधी असलेले शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना झाला होता. या निवडणुकीत घाटाखालील तीनही मतदारसंघातील मतदानाच्या टक्क्यात ५ ते १० टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवडचा वाढला टक्कापिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग १५ वर्षे सत्ता असलेले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या चुरशीची लढत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मतदानाचा टक्का गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा वाढलेला आहे. त्याचा फायदा बारणे की पार्थ पवार यापैैकी कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळVotingमतदान