शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाल्यातील गुंडशाही संपवणार कोण? ‘एपीएमसीसह पाेलिसांनी त्वरित कडक भूमिका घ्यावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:33 IST

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

नवी मुंबई : भाजीपाला मार्केटमधील पाला उचलण्याचा वाद  गोळीबारापर्यंत गेल्यामुळे बाजार समितीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. मार्केट स्वच्छतेचा अधिकृत ठेका दिलेला असताना सामाजिक संस्थांच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना अभय का दिले जात आहे, असा प्रश्न केला जात आहे.

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाजार समितीमध्ये  कोबी, फ्लॉवरचा पाला उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाल्यात दडलेल्या अर्थकारणामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लाखोंच्या उलाढालीमुळे गुंडांचा शिरकावलाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे तो उचलण्यासाठीच्या व्यवसायात गुंडांचाही शिरकाव झाला आहे.हाणामारी, धमक्या देणे व राडे हे नित्याचेच झाले आहेत. आता थेट गोळीबार करण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. अनेक वर्षांपासून पाल्यावरून वाद होत आहेत. गुन्हेगारी विश्वाशी संबंध असलेल्यांचा यामध्ये सहभाग आहे. 

शासनालाही द्यावा अहवालशासनाने सामाजिक संस्थांना पाला उचलण्यासाठी दिलेले काम योग्य नाही, हे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारीही खासगीत बोलतात. येथील गुंडगिरी थांबविली पाहिजे, असेही सांगितले जात आहे. आता येथील स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून कचरा उचलण्याची जबाबदारी साफसफाई ठेकेदारांवरच सोपविण्यात यावी तरच गुन्हेगारीची साखळी मोडीत निघेल, असा सूर उमटू लागला आहे.

अनेकांवर दाखल आहेत गुन्हे काम करणाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. वास्तविक, बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये साफसफाईसाठी अधिकृतपणे ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. सर्व कचरा उचलण्याची जबाबदारी या ठेकेदाराचीच आहे. ठेकेदारही जबाबदारी टाळत नाही. रात्रंदिवस स्वच्छतेचे काम सुरू आहे. यानंतरही फक्त कोबी, फ्लॉवरच्या पाल्याची जबाबदारी एखाद्या संस्थेवर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना का दिली जात आहे, असा प्रश्न केला जात आहे. यावरून झालेल्या गोळीबारामुळे बाजार समितीच अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभय देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती