शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

आमची उद्याने काेणी पळविली, परत द्या!

By नारायण जाधव | Updated: June 19, 2023 11:33 IST

गेल्या वर्षी तर शहराने देशात तिसरा क्रमांक मिळविला होता. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही सातत्याने डंका वाजवला आहे.

भारतातील सर्वांत मोठे सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. शहर स्वच्छतेत नवी मुंबई महापालिकेने सलग महाराष्ट्रात पहिला आणि देशात पहिल्या दहामध्ये क्रमांक मिळविला आहे. गेल्या वर्षी तर शहराने देशात तिसरा क्रमांक मिळविला होता. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही सातत्याने डंका वाजवला आहे. अशा सर्वांगसुंदर-स्वच्छ शहराच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्यानाचा एक भूखंड एमआयडीसीने उद्योगासाठी दिल्याने स्थानिक रहिवासी पेटून उठले आहेत. यानिमित्ताने उद्याने आणि मैदानांचा विषय ऐरणीवर आला आहे.

महापालिकेचे विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहराचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्याचा विडा उचलून त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरांतील उद्यानांची विषमता चव्हाट्यावर आली आहे. १८ ते साडेअठरा लाखांवर लोकसंख्या असलेल्या या शहरातील सुमारे १८ ते १९ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. मात्र, त्यांच्यासाठी अवघे एकच उद्यान आहे. शहराचे मूळ रहिवासी असलेल्या गावठाणांचीही अशीच अवस्था आहे. सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या विकास आराखड्यातही गावठाणे आणि झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक सुविधांचा विचार केलेला दिसत नाही. मग सुनियोजित शहरांतील गावठाणे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब नागरिकांना उद्यानात हिंडण्या-बागडण्याचा अधिकार नाही का, अशाने शहराचा हॅपिनेस इंडेक्स कसा वाढेल, असे प्रश्न विचारावेसे वाटत आहेत.

नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरातील औद्याेगिक पट्ट्यात आणि वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. शिवाय जुनी गावठाणे आहेतच. शहराची जन्मदाती सिडकोसह एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेनेही शहरातील गावठाणे आणि झोपडपट्ट्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वॉटर, मीटर आणि गटर या सुविधा दिल्या म्हणजे नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी संपली, असे नाही. एका अभ्यासानुसार २०११ मध्ये शहरात ४७ झोपडपट्ट्या होत्या. त्यातील तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, गणपतीपाडा-वारलीपाडा आणि हनुमाननगर या ४ झोपडपट्ट्या राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीवर, तर उर्वरित एमआयडीसीसह सिडकोच्या जमिनीवर आहेत. २०२२ च्या युवा-जीएचएसएस सर्वेक्षणात ही संख्या वाढली असून ७६ झोपडपट्ट्यांवर गेली आहे. आता महापालिकेने २०२२ मध्ये तयार केलेल्या विकास आराखड्यातही गावठाणे आणि झोपडपट्ट्यांचा विचार केलेला नाही. झोपडपट्ट्याच नव्हे, तर मूळ २९ गावठाणांच्या विकासासह तेथील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे.

तीन तिघाडे आणि काम बिघाडे  नवी मुंबईत सिडको, महापालिका आणि एमआयडीसी अशी तीन प्राधिकरणे आहेत. त्यांच्यात विकास आणि नियोजनाच्या हक्कांवरून वाद आहेत. मात्र, या वादात शहरवासीय भरडले जात आहेत; परंतु यावर भांडायला, त्यांच्या मानवी हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्राधिकरणांना जाब विचारण्याची हिंमत एकही लोकप्रतिनिधी दाखवित नाही, हे खरे दु:ख आहे.

    नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत हल्ली जी १५७ उद्याने आहेत त्यातील ९८ उद्याने बेलापूर, नेरूळ व वाशी या तीन विभागांतच आहेत.     उर्वरित पाच विभागांत फक्त ५९ उद्याने आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये दिघा येथे एकमेव उद्यान आहे.     केवळ झोपडपट्टी विभागाच नाही तर शहरातील मूळ २९ गावठाणांची अनियंत्रित अशी वाढ झाली आहे. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांनी त्यांना वेढले आहे. त्या ठिकाणीही उद्याने, मैदाने, रुग्णालयांची वानवा आहे.     सार्वजनिक सुविधांसाठी मोकळ्या जागाच शिल्लक नसल्याने येथे राहणाऱ्या लोकसंख्येच्या हॅपिनेस इंडेक्सचे काय? त्याचे उत्तर कोण देणार?

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई