शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचे ?

By नारायण जाधव | Updated: March 31, 2025 13:02 IST

Unauthorized Construction: नवी मुंबई महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत किती बेकायदा वा अनियमित बांधकामे आहेत, अशी विचारणा करून उच्च न्यायालयाने चार महिन्यांत सर्वेक्षण करून त्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

- नारायण जाधव(उपवृत्तसंपादक)नवी मुंबई महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत किती बेकायदा वा अनियमित बांधकामे आहेत, अशी विचारणा करून उच्च न्यायालयाने चार महिन्यांत सर्वेक्षण करून त्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. यामुळे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालीच कशी, त्यांना संरक्षण दिले कोणी, त्यांच्यावर कधी आणि कोणती कारवाई झाली, शिवाय यापूर्वी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नानाविध आदेश, परिपत्रके काढली आहेत, त्यांचे काय झाले. त्यातील आदेश, सूचना पायदळी तुडविणारे कोण आहेत, त्यांच्यावर शासन, राज्यकर्ते कारवाई का करीत नाहीत, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.

नवी मुंबईत सिडको, वन विभाग, एमआयडीसीसह शासनाच्या जागेवर दहा हजारांहून अनधिकृत बांधकामे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची याचिका किशोर शेट्टी यांनी तर यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांवर कार्यवाही होत नसल्याने अवमान याचिका राजीव मिश्रा यांनी दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेस खडेबोल सुनावून चार महिन्यांत सर्वेक्षण करून अशा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.

वास्तविक, नवी मुंबई हे एक सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातील विविध यंत्रणांतील उच्चपदस्थांनी भूमाफियांना वारंवार संरक्षण दिल्याने शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. यामुळेच थातूरमातूर कारवाई वगळता महापालिका, एमआयडीसी, सिडकोने अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई केलेली नाही. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामे होऊ नये, सामाजिक कार्यासाठीचे भूखंड सिडको, एमआयडीसीने विकू नये, यासाठी शहरातील आमदार गणेश नाईक यांनी वारंवार आवाज उठविला आहे.

हे आदेश गेले कुठे?नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीएसारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे देऊन त्या आपल्या संकेतस्थळांसह वृत्तपत्रांत प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश आहेत.तसेच अशी बांधकामे वाचविण्यासाठी भूमाफियांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्यास सांगितले आहे. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे, विशेष न्यायालये सुरू करण्याचे नगरविकास खात्याचे आदेश कागदावरच आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई