शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींना मदत करणारा नगरसेवक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:04 IST

खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर ६ येथून सोनाली अब्दुल खुददुस खान या बांगलादेशी महिलेला अटक केली.

मयूर तांबडेपनवेल : खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर ६ येथून सोनाली अब्दुल खुददुस खान या बांगलादेशी महिलेला अटक केली. महिलेला एका नगरसेवकाने मदत केली असून, त्या नगरसेवकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, हा नगरसेवक कोण याची माहिती मिळू शकलेली नाही.खांदेश्वर पोलिसांनी अटक केलेल्या सोनाली अब्दुल खुददुस खान या महिलेकडे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड ही खोटी शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. एका नगरसेवकाच्या मदतीने ही सारी बनावट कागदपत्रे बनवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे बांगलादेशी नागरिक सीमा पार करून भारतात प्रवेश करत आहेत. भारतात आल्यानंतर मिळेल ते काम करून पोट भरताना दिसत आहेत. याचाच फायदा राजकीय पुढारी घेत आहेत. ते त्यांची बांगलादेश देशाची ओळख लपवून ठेवण्यास मदत करत असल्याचे पुढे आले आहे. व्होटबँक सांभाळण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशा प्रकारे बाहेरच्या देशातून आलेल्या व बेकायदेशीररीत्या भारतात राहत असलेल्या परदेशी नागरिकांना भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या महिलेला मदत करणारा ‘तो’ नगरसेवक कोण? याची माहिती मिळालेली नाही. या महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.>चिखले येथे घरजावई व नाव बदलून राहणारा मनोहर राहू पवार (इनामुल मुल्ला) यांच्याकडेही बोगस नावाने शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. रेशनिंग कार्ड व ग्रामपंचायतकडून पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. मात्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, मतदान ओळखपत्र यांची माहिती अद्यापही पोलिसांना मिळाली नाही. अद्याप या प्रकरणात तालुका पोलिसांनी बांगलादेशीला बोगस कागदपत्रे मिळवून देणाऱ्या व मदत करणाऱ्यांना अटक केलेली नाही, त्यामुळे पनवेल व आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशी नागरिकांचे वाढते प्रमाण धोकादायक ठरू लागले आहे.