शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:18 IST

पनवेल तालुक्यातील स्थिती

ठळक मुद्देकोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मयूर तांबडेलोकमत न्यूज नेटवर्क नवीन पनवेल :  अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू  असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत झाले आहे; मात्र अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, धान्याचे वाटप लवकर करा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केलेत. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास महिना होत आला तरी पनवेल तालुक्यात अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. 

पनवेलमध्ये एकूण १९३ रेशन धान्याची दुकाने आहेत. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल, अशी शक्यता आहे. याचवेळी केंद्र शासनाकडूनदेखील मोफत धान्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मे व जून अशा दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोरगरीब रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे; मात्र केंद्राकडूनदेखील मोफत धान्य वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन धान्य वाटप करावे, तसेच राज्य शासनाने घोषणा केलेले धान्यदेखील लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे. - सुधीर आंबेकर 

हाताला काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केली; मात्र धान्याचे वाटप अद्याप रेशन दुकानातून झालेले नाही. मोफत धान्य तत्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे, यासंदर्भात काहीच माहिती नाही.- रवींद्र पाटील

गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप तत्काळ करावे.- विकास खारुटकर 

१० मे पर्यंत पनवेल तालुक्यातील सर्व दुकानांत धान्य पोहोचणार आहे. सध्या ४० रेशन दुकानांत धान्य पोच झाले आहे. - स्मिता जाधव, पुरवठा अधिकारी- पनवेल

कार्डधारकअंत्योदय     ६०९४ बीपीएल आणि केशरी (प्राधान्य योजना )     ६२३६० लोकसंख्या     २,५६,२५५

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई