शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली क्षेत्रातील वीज समस्या कधी सुटणार?; रहिवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:45 IST

१५ वर्षे प्रश्न रखडला गाव, गावठाण, झोपडपट्टी परिसरात अडचणी

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेषत: गाव, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात वीज समस्या गंभीर बनली आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे असल्याने या क्षेत्रातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.विधानसभेच्या ऐरोली मतदार संघात सर्वाधिक झोपड्या आहेत. तसेच या विभागातील मूळ गावांत गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. त्यामुळे गावांतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वीज व पाणी या मूलभूत गरजा असल्याने मागेल त्याला या सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचा परिणाम म्हणून बेकायदा इमारती, झोपड्या, भंगाराची गोदामे व इतर लघुउद्योगांना विजेचा मागणी तसा पुरवठा करण्यात येत आहे. मागील पंधरा वर्षांत या क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे; परंतु वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणा जुन्याच आहेत. आजही अनेक भागात डोक्यावर लोंबकळणाºया विद्युत केबल्स पाहावयास मिळतात. भूमिगत विद्युत केबल्सचा केवळ अर्थपूर्ण फार्स ठरला आहे. डीपी बॉक्सचे केवळ सांगाडे उरले आहेत. ऐरोली, रबाळे, गोठीवली व घणसोली विभागात वीज समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येते. या विभागात अखंडित वीज पुरवठा ही बाब स्वप्नवत झाली आहे. दिवसभरातून एकदा तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत केबल्सला आग लागणे, डीपी बॉक्समध्ये बिघाड या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात ऐन परीक्षेच्या काळात या विभागातील विद्युत पुरवठा तब्बल १७ तास खंडित राहिला. विशेष म्हणजे मागील तीन चार महिन्यात या विभागात विद्युत केबल्सला आग लागण्याच्या पंधरा ते वीस घटना घडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा संताप पसरला आहे. पंधरा वर्षांपासून या विभागातील विजेचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा प्रचाराच्या अग्रभागी राहिला आहे. डीपी बॉक्सची दुरुस्ती, अपुºया विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या वेळोवेळी घोषणा करण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नाही.

टॅग्स :electricityवीज