शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२०० कॅमेरे तपासले तेव्हा गुजरातला पळून जाणारी टाेळी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:43 IST

चार गुन्ह्यांची उकल, ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ५ जणांच्या टोळीला तलासरीत जेरबंद करण्यात आले. ही टोळी गुजरातला पळून जाण्यापूर्वीच नवी मुंबई पोलिस दलाच्या सीबीडी पोलिसांनी त्यांना अटक केली. या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

सीबीडी परिसरात चोरी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून तपासावर भर दिला होता. त्यासाठी उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी निरीक्षक हनीफ मुलाणी, सहायक निरीक्षक सुरेश डांबरे, उपनिरीक्षक विष्णू वाघ आदींचे पथक केले होते. 

मुंबई, नवी मुंबईतील गुन्ह्यांची उकलअटक करण्यात आलेले सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान (३५), नीलेश राजू लोंढे (२२), संजय रत्नेश कांबळे (४२), गुड्डू रामधनी सोनी (३९), विक्की राजू लोंढे (२०) हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. हे सर्व जण पोलिसांच्या हाती लागल्याने सीबीडी, खारघर, नेरूळ व मुंबईतील मालवणीतील घरफोडी, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईदरम्यान ८ लाख २२ हजारांचे २० तोळे सोने, एक फोन व रिक्षा असा एकूण ९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपींचे पोलिस रेकॉर्डअथक प्रयत्नाअंती पोलिसांनी मुसक्या आवळलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यापैकी सद्दाम हुसेन याच्यावर १२, तर नीलेशवर १४ गुन्हे दाखल असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झालेे आहे. 

सीबीडी परिसरात केली हाेती चाेरीया पथकाने सीबीडी परिसरात घडलेल्या एका घरफोडीच्या तपासात परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयितांची माहिती मिळाली असता, त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली होती. या पथकांनी सराईत टोळीचा सुगावा घेत लुटारूंच्या मुसक्या आवळल्या.