शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास, नवी मुंबई! स्वच्छता अभियानात तुम्ही देशात तिसरे आलात! राष्ट्रपतींकडून मिळाला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 05:49 IST

नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन मिळविले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शाब्बास, नवी मुंबईकर. आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि जबरदस्त यशही मिळविले. स्वच्छ शहरांच्या देशपातळीवरील तपासणीत नवी मुंबई शहर राज्यात पहिले आणि देशात तिसरे ठरले आहे. आता अभिमानाने सांगा...आम्ही नवी मुंबईत राहतोय..! नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन मिळविले. ओडीएफ कॅटेगिरीमध्ये सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन मिळवून लौकिक वाढविला आहे. दुसरा क्रमांक जाहीर न केल्याने नवी मुंबई तशीही देशात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळ्यात आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मी, लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे व सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय योगदान दिले. हा बहुमान संपूर्ण शहरवासीयांचा आहे. यापुढील काळात अभियानात सातत्य राखले जाईल. पहिला क्रमांक हा ध्यास समोर ठेवून नवीन उत्साहाने स्वच्छता अभियान राबविले जाईल.- राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका

महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हीरो आहेत. यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असेच सातत्य राखूया. -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र देशातील सर्वांत स्वच्छ राज्य

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्राने सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून अव्वल क्रमांक पटकाविला. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा, तर एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात सासवडने (जि. पुणे) देशात प्रथम पुरस्कार मिळविला.

टॉप ५ स्वच्छ शहरे

इंदूर, सूरत, नवी मुंबई, विशाखापट्ट्णम, भोपाळ

टॉप ३ स्वच्छ राज्ये

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई