शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 02:32 IST

निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्चला अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. परंतु निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत याविषयी काहीही कार्यवाही होणार नाही. या निर्णयाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. निवडणुकीपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सीवूडमधील पदाधिकारी समीर बागवान व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ सेक्टर ६ मधील पदाधिकारी महादेव पवार यांनी दिली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमधून कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रारूप मतदार याद्या मिळाल्या असल्यामुळे प्रभागामधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, कोण कोणत्या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहे, स्थलांतर झालेले मतदार कुठे वास्तव्यास आहेत याविषयी माहिती संकलित करणे व त्यांच्यापर्यंत पोहोचणे इच्छुकांना शक्य होणार आहे. याशिवाय प्रभागामधील प्रचारासाठीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस