शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:18 IST

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.

नवी मुंबई, पनवेल : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. गुरुवारी सकाळी बाप्पाचे धूमधडाक्यात आगमन होईल. त्या दृष्टीने गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. तयारीसाठी बुधवारचा अखेरचा दिवस असल्याने शहरातील बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या होत्या. दरम्यान, यावर्षी नवी मुंबईसह पनवेल विभागात ६१० सार्वजनिक, तर सुमारे ७० हजार घरगुती गणेशस्थापना होणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही विभागांतील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा कामाला लागल्या आहेत.बुधवारी सकाळपासून वाशीच्या एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली होती. सजावटीसाठीच्या साहित्यापासून प्रसादाची मिठाई, गणरायाचे अलंकार, रोषणाई आदीच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. खरेदीसाठी नवी मुंबईसह पनवेल, मुंबई व ठाणे येथून ग्राहक आल्याने एपीएमसी परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. एपीएमसीबरोबरच शहराच्या विविध भागांतील लहान-लहान बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी पदपथच बळकावल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ, बेलापूर सीबीडी या परिसरातील दुकानांत ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. नवी मुंबईप्रमाणेच पनवेल परिसरातही शेवटच्या दिवशी ग्राहकांनी खरेदीवर भर दिला होता, त्यामुळे येथील प्रमुख बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या होत्या. सकाळपासूनच ग्राहकांची रीघ लागल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तींचे बुधवारी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले.नवी मुंबई विभागात ३७५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची नोंद आहे, तर तब्बल ३०,१५२ घरगुती गणपती आहेत. तसेच पनवेल विभागात २३५ सार्वजनिक, तर ३९ हजार ७०० घरगुती गणपतीची नोंद केली आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी सुमारे ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या दिमतीला जवळपास १५० अधिकारी असणार आहेत.>रंगीबेरंगी सजावटीचे साहित्यबाजारपेठेत दुकानांबाहेर पूजा साहित्य, प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदीमुळे यंदा इकोफ्रेंडली सजावट म्हणून रंगीबेरंगी अस्सल फुलांच्या आणि कागदी फुलांची रेडिमेड मखर, नानाविध रंगीत विद्युत रोषणाईची तोरणे, कापडावर सुंदर नक्षीकाम केलेली तोरणे, कंठमाला, सजावटीची फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.>विसर्जन तलावांची पाहणी : महापालिकेने गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी केली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत २३ तलाव आहेत. त्यापैकी १४ तलावांत इटालियन गॅबियन वॉल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जनस्थळावर ७०० स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बुधवारी या विसर्जन तलावांची पाहणी केली. पनवेल विभागातही महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. एकूणच या वेळी गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव