शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नवीन वर्षात घडणार जलमार्गाचा प्रवास; सिडकोचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 02:14 IST

बीपीटी, मेरीटाइम बोर्ड, जेएनपीटीचे सहकार्य

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. नेरूळ व बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल २0२0 पर्यंत हे काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यावृत्तास दुजोरा दिला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या सोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याच्यादृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक प्रवासी बोट व एक वॉटर टॅक्सी घेण्याची योजना आहे. त्या संदर्भात शिपिंग कॉर्पोरेशनशी चर्चा सुरू असल्याचे लोकेश चंद्र यांनी लोकमतला सांगितले. एप्रिल २0२0 पर्यंत नेरूळ येथील जेट्टीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी म्हणजेच साधारण मे २0२0 मध्ये प्रत्यक्षात जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून नवी मुंबईत वाशी, नेरुळ व बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे. बेलापूर येथील खाडीकिनारी सिडको व मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने जेट्टी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर नेरूळ येथील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यानंतर वाशी येथील प्रस्तावित जेट्टीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तिन जेट्टीच्या माध्यमातून भविष्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसर जोडणे शक्य होणार आहे.नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोसह बीपटी, जेएनपेटी व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त प्रयत्नातून नवी मुंबई ते मुंबई दरम्यान, जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे जेट्टी उभारण्याच्या कामाला काहीसा विलंब झाला. मात्र सध्या नेरूळ येथील जेट्टीचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन वर्षात नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवेचा आनंद लुटता येणार आहे.- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडको