शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये पाणीकपात

By admin | Updated: April 9, 2016 02:24 IST

माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे.

कर्जत : माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे. बहुचर्चित पाणी योजनेचे काम यावर्षी तरी पूर्ण होईल, ही आशा येथील नागरिकांमध्ये होती. निदान या वर्षी तरी पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे वाटत होते. परंतु मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याने अचानक माथेरान बाजारपेठेत राम चौकात एक दिवसाआड संपूर्ण माथेरान शहराला पाणीपुरवठा केला जाईल, असा फलक लावल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले. माथेरान शार्लेट तलावामध्ये मुबलक पाणी असतानादेखील असा फलक का लावण्यात आला, अशी चर्चा शहरात चालू आहे.माथेरान शहराला, वाढत्या लोकसंख्येला व दरवर्षी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता १९८९ मध्ये शासनाने वाढीव पाणी योजना नेरळ कुंभा उल्हास नदीतून पाणीपुरवठा चालू केल्याने माथेरानकारांची थोड्या प्रमाणात पाण्याची समस्या संपुष्टात आली. परंतु काही वर्षांतच नेरळ-माथेरानकरिता वापरलेली पाइपलाइन निष्कृष्ट दर्जाची असल्याने जागोजागी फुटत गेली व लाखो लीटर पाणी वाया जाऊ लागले. विशेष म्हणजे ही जी निष्कृष्ट दर्जाची पाइपलाइन वापरली होती, त्यासाठी त्या ठेकेदारची चौकशी देखील केली नाही व ती पाइपलाइन जुनी व पूर्णपणे निकामी झाल्याने माथेरानकरांना पुन्हा पाण्याची टंचाई भासू लागल्याने कर्जत आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून अनुदानातून निधी उपलब्ध करून झाला, व पाइपलाइन टाकण्याचे कामही चालू झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे आजही काम पूर्ण झाले नसल्याने व टाकलेल्या नवीन पाइपलाइनमधून पाणीगळतीहोत असल्याने लाखो लीटर पाणी दररोज वाया जात आहे.