शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार बंद, लॉकडाउननंतर टंचाई सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:15 IST

लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाउन घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उप-अभियंता रणजीत बिरंजे यांनी दिली.

उरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात जून महिना अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाउन घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उप-अभियंता रणजीत बिरंजे यांनी दिली.उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यात रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने डिसेंबर २०१९ पासूनच सिडकोकडून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०१९ पासून सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज पाच एमएलडी इतके पाणी घेतले जात आहे.सिडकोकडून घेण्यात येणारे पाच एमएलडी पाणीही कमी पडत असल्याने आणखी दोन असे एकूण सात एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी एमआयडीसीने केली. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप सिडकोने सहमती दर्शवलेली नाही.>दुसºया टप्प्यातील संचारबंदीची मुदत ३ मे रोजी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठाबंद करून शटडाउन घेण्यात येणार आहे.- रणजीत बिरंजे, उपअभियंता, उरण एमआयडीसी