शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

शहरात पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: July 24, 2015 03:01 IST

: मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत

नवी मुंबई : मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत असल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीमध्ये याविषयी लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनास धारेवर धरले आहे. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मोरबे धरणामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. उन्हाळ्यात सर्व महापालिकांना पाणीकपात करावी लागत असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी मिळते. परंतु साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याची उधळपट्टी वाढू लागली आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कामांसाठीही वापरले जात आहे. शहरात होणारा पाणीपुरवठा व पाणीगळतीविषयी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शहरात सद्यस्थितीत ४२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत आहे. एकूण पाण्यापैकी तब्बल ८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण कोपरखैरणे व दिघा परिसरातील एकूण रहिवाशांना जेवढे पाणी लागते तेवढे आहे. याविषयी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. पाणीगळतीची चौकशी झाली पाहिजे. नक्की पाणी कुठे मुरत आहे हे पाहून ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिवराम पाटील यांनी केली. ऐरोली व दिघा परिसरांतील नागरिकांना वारंवार शट्डाऊनला सामोरे जावे लागत असल्याचे एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना नळजोडणी वेळेवर मिळत नसल्याची खंत अपर्णा गवते व जगदीश गवते यांनी व्यक्त केली. सीआरझेडमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने स्काडा तंत्राचा वापर केला होता, त्याचा काय उपयोग झाला, अशी विचारणा रवींद्र इथापे यांनी केली. झोपडपट्टीमध्ये अनेकांना पाणी दिले जात नसून त्यांचा नैसर्गिक हक्क डावलला जात असल्याचे रामचंद्र घरत यांनी स्पष्ट केले आणि नळजोडणीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. सभागृहनेते जयवंत सुतार यांनीही चोरीच्या नळजोडणी तपासाव्यात. पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली. शहरात पाणी मुबलक असले तरी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम होतील, असेही निदर्शनास आणून दिले.