शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:36 IST

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत.

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावात अशाच प्रकारे तीन ते चार भंगारविक्रेत्यांनी एक बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेवर गोदामे थाटली आहेत. त्यामुळे परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच भुरट्या चोºयांत वाढ झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ कि.मी. क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आले आहे. मागील दीड-दोन दशकांत विविध कारणांमुळे या क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी इतर टाळेबंदी जाहीर करून इतर राज्यांत स्थलांतरण केले आहे. बंद पडलेल्या या कारखान्यांतील यंत्र व इतर लोखंडी साहित्यावर भंगारमाफियांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी भंगारचोरांचा बोलबाला असतो. स्थानिक पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे भंगाराची दुकाने उभारली जात आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावाजवळ बंद पडलेल्या एका कंपनीच्या प्रशस्त जागेवर मागील तीन महिन्यांपासून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. विशेष म्हणजे, या गोदामांना अधिकृत वीज व पाणीपुरवठा नाही. त्यामुळे संबंधितांकडून वीज व पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या बेकायदा गोदामामुळे परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांमुळे सिमेंटच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.बोनसरी प्रमाणेच एमआयडीसीच्या प्रत्यक्ष क्षेत्रात भंगारविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या अंधारात बंद पडलेल्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांना धमकावून लोखंडी साहित्य, केमिकल्सचे ड्रम व इतर सामग्रीची चोरी केली जाते. या भंगारचोरीच्या मागे या क्षेत्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या गोदामचालकांचाच हात असल्याचे याअगोदर अनेकदा स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही या बेकायदेशीर व्यवसायाला नक्की कोणाचे पाठबळ मिळते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.>कारखानदारांची डोकदुखीविविध कारणांमुळे एमआयडीसीतील शेकडो कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्यांपैकी अनेक कंपन्यांच्या परिसरातील मोकळ्या जागांवर भंगाराची गोदामे, हॉटेल्स व गॅरेजेस थाटली आहेत. या अतिक्रमणाला स्थानिक पुढारी, एमआयडीसीचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अप्रत्यक्ष अभय आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची अतिक्रमित जागा परत मिळविताना कारखानदारांची कसरत होत आहे. भंगारविक्रेत्यांशी दोन हात करण्याऐवजी अनेकांनी न्यायालयाचा आधार घेतला आहे. या माध्यमातून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.