शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध...

By नेहा सराफ | Updated: March 19, 2019 05:41 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे.

- मनीषा म्हात्रे - मुलुंड विधानसभा मतदार संघ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे. मुलुंडमधील शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका उघडपणे घेतली असताना बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे.उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचे विधानसभा क्षेत्र म्हणून मुलुंडकडे पाहिले जाते. मुंबईचे पूर्वेचे प्रवेशद्वार म्हणजे मुलुंड. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंड विस्तारले आहे.उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती या मतदारसंघामध्ये दिसून येते. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. मुलुंडमध्ये या वर्षी मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली आहे. मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार १० सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत दोन लाख ७२ हजार ८७८ इतकी मतदार नोंदणी झाली होती, तर ३१ जानेवारी २०१९ रोजीपर्यंत झालेल्या मतदार नोंदीनुसार २ लाख ७७ हजार ३८ इतकी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुलुंडमध्ये ४१६० मतदार वाढले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना