शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरच्या मजल्यावर घर हवे, मोजा अधिक पैसे; सिडकोची २६ हजार घरांची योजना : ७ ऑक्टोबरला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 08:37 IST

CIDCO Lottery 2024: सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या गृहयोजनेचा ७ ऑक्टोबरला  शुभारंभ होत आहे.

- कमलाकर कांबळे

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या गृहयोजनेचा ७ ऑक्टोबरला  शुभारंभ होत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल  आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे. शहराच्या विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सुरू आहे. यातील घरांच्या किमती मजल्यानुसार आकारल्या जाणार  आहेत. वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

   सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मान्यता मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी मिळाली आहे. यातील २६ हजार घरांची सोडत ७ ऑक्टोबरला होणार आहे. 

मजल्यानुसार दर बावीस मजली टोलेजंग इमारतींतील घरांच्या किमती मजल्यानुसार निश्चित होणार आहेत. सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट १० रुपये अतिरिक्त आकारणी होणार आहे. त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच २०, ३०, ४० असे चढ्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. 

शिल्लक घरांचा समावेश१३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित १३ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यातील  सर्वाधिक जवळपास ५० टक्के घरे  एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश केलेला नाही. 

सर्वात मोठी गृहयोजना५० वर्षांत सिडकोने वेगवेगळ्या गृहयोजनांच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधली आहेत. २०१८ मध्ये दोन टप्प्यांत जवळपास १८ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आतापर्यंतची ती सर्वांत मोठी गृहयोजना ठरली होती. आता २६ हजार घरांची योजना जाहीर होत आहे. 

टॅग्स :cidcoसिडको