शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन ठिकाणी भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:38 IST

सानपाडात भुयारी मार्गात पाणी : सीवूडमध्ये दुकानावर वृक्ष कोसळला

नवी मुंबई : शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली. भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

नवी मुंबई परिसरामध्ये गुरुवारी २४ तासांमध्ये ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. एक ठिकाणी शॉर्टसर्किट व एक ठिकाणी आग लागली होती. शुक्रवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सहा ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. सीवूडमध्ये एका दुकानावर वृक्ष कोसळला. सेक्टर ४८ मधील प्रियदर्शनी सोसायटीजवळील मोकळ्या भूखंडावरील संरक्षण भिंतही कोसळली. नेरुळ सेक्टर १५ मधील गंगा-जमुना सोसायटी आवारामध्येही संरक्षण भिंत कोसळली.

शहरातील बहुतांश भुयारी मार्गामध्ये पाणी साचले होते. पामबीच रोडवरील करावे येथील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे तेथून ये-जा करणे अशक्य झाले होते. महामार्गावरून सानपाडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील भुयारी मार्गामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या ठिकाणी अनेक वाहने अडकली होती. कोपरखैरणेसह इतर ठिकाणीही अशीच स्थिती झाली होती. भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी मोटरपंप बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी केली आहे.

पनवेलमध्ये १६१ मि.मी.पाऊसगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारीही पनवेलमध्ये कायम होता. सायंकाळी उशिरानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागले. सायन-पनवेल महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले होते, तर पनवेल-सीएसटी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही उशिराने सुरू होती. पनवेल तालुक्यात १६१ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद दिवसभरात करण्यात आली. पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत तसेच ग्रामीण भागात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तालुक्यातील कासाडी, गाढी तसेच कर्णावती नदी दुथडी भरून वाहत होती. सायन-पनवेल महामार्गावर खारघर, कामोठे, कळंबोली या ठिकाणी दोन लेन पाण्याखाली गेल्या होत्या. १४ वर्षांपूर्वी याच दिवशी सर्वत्र महापूर आला होता. या दिवसाची आठवण शुक्रवारच्या पावसाने करून दिली.