शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: April 25, 2017 01:28 IST

पनवेल महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले आहे.

वैभव गायकर / पनवेलपनवेल महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच महानगरपालिका असून, पहिल्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सर्व राजकीय पक्ष, अपक्ष, आघाड्यांमधून जवळजवळ ८०० उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकच झाली नसल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रि या सुरू झाली नसल्याने आयत्या वेळेत सर्वांचीच दमछाक होण्याची शक्यता आहे.पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. याकरिता नामनिर्देशित पत्र दाखल करण्याची तारीख २९ एप्रिल ते ६ मे आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या घडीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे असताना अद्याप निवडणूक निर्णय अधिकारीच उपलब्ध नसल्याने इच्छुकांना पालिकेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे इच्छुकांनी कोकण भवन याठिकाणाहून जात पडताळणीसाठी अर्ज प्राप्त केले आहेत. अर्जाच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची सही बंधनकारक असल्याने त्या सहीशिवाय पुढची प्रक्रि या होत नसते. विशेष म्हणजे निवडणूक लढविणारे अनेक उमेदवार महाराष्ट्राच्या विविध भागातून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हा अर्ज उमेदवाराने जातीचा दाखला प्राप्त केलेल्या तहसीलमध्ये पडताळणीसाठी जात असतो. मात्र बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असताना अद्याप निवडणूक निर्णय अधिकारीच नसल्याने अनेक इच्छुक उमेदवार हतबल झाले आहेत. कळंबोली प्रभाग क्र मांक ७ मधील इच्छुक उमेदवार चंद्रकांत राऊत हे अनेक दिवसांपासून पालिकेच्या निवडणूक कक्ष, कोकण भवन याठिकाणी खेटे मारीत आहेत. अर्ज प्राप्त करून अनेक दिवस झाले तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी नेमला नसल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र हलविण्यास अडचण निर्माण होत आहे. राऊत हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांना ही प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरला जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत होणारा उशीर हा उमेदवारांना त्रासदायक असल्याने लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जावा, अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे युतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तसेच पनवेल महानगर पालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे गरजेचे आहे, अन्यथा जसजसे दिवस जवळ येतील तसतशी निवडणूक कक्षात इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. नागरी सुविधाही सापडल्या आचारसंहितेच्या कचाट्यात-पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच शहर परिसरात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या कामांना फटका बसत आहे. आचारसंहितेच्या नावाखाली आता ही कामे बंद करण्यात आल्याने निवडणूक संपेपर्यंत तरी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुरू केलेले तुम्ही बोला... आम्ही करतो... हे अभियान थंड पडले आहे. महापालिकेची स्थापना होताच इच्छुकांनी पहिले नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. फुटपाथचे काम असो वा अंतर्गत रस्त्यांचे, गटारांची सफाई, डागडुजी असो वा पाण्याचा प्रश्न तो प्राधान्याने सोडवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसत होती. मात्र निवडणूक जाहीर होताच विकासकामांचा खोळंबा झाला आहे. पहिल्या महानगरपालिकेचा सदस्य बनण्यासाठी सर्व पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपण मतदाराच्या कसे जवळचे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. नवीन पनवेल सेक्टर १ व २ मधील रस्त्याचे काम अनेक वेळा सिडकोकडे तक्र ार करूनही झाले नव्हते. येथील सोसायटीतील नागरिकांनी शेकापक्षाच्या नेत्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर लगेचच जनार्दन म्हात्रे ट्रस्टतर्फे तेथील रस्त्याचे काम सुरू केले. भाजपाचे कार्यकर्ते लगेच तेथे सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेऊन काम थांबवण्यासाठी आले. कामाचे श्रेय लाटण्यावरून याठिकाणी वाद झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. दुसऱ्या दिवशी भाजपातर्फे रस्त्याच्या कामाचा नारळ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फोडण्यात आला, पण अद्याप त्या रस्त्याचे काम झाले नाही. आता आचारसंहिता लागल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. त्यानंतर पाऊस सुरू होईल, पुढे महानगरपालिकेकडे हस्तांतरणाचे कारण देऊन काम करणार नाही. दोघांच्या भांडणात रस्ता मात्र तसाच राहिला. त्यामुळे चांगल्या रस्त्यासाठी पनवेलकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागत आहे. आमच्या भागातील रस्त्याचे काम जे.एम. म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत होते. भाजपावाल्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणून काम थांबवल्याचे एका रहिवाशाने सांगितले.