शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांसाठी आणखी वाट पाहा, विविध कारणांमुळे सोडतीस होतोय विलंब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:16 IST

सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला.

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये गृहप्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. या घरांची योजना कधी जाहीर होणार, अशी विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर यातील काही घरांची योजना जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, आता ही शक्यता धूसर झाली असून, सिडकोचे घर घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला. गेल्या महिन्यात या योजनेची सोडत पार पडल्यानंतर आता नवीन योजना कधी जाहीर होणार, अशी विचारणा ग्राहकांकडून केली जात आहे. अहवाल प्रलंबित राज्य शासनाच्या निर्देेशानुसार सिडकोने याबाबतचा अहवाल संबंधित विभागाला सादर केला आहे. मागील एक वर्षांपासून या अहवालावरील निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळेसुद्धा घरांची नवीन योजना जाहीर करण्यास सिडको धजावत नसल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर घरांची योजना जाहीर केली होती. त्याच धर्तीवर नवीन योजना घोषित करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

सल्लागार संस्थेची नेमणूक-  सिडको सध्या वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर आदी नोडमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जवळपास २५ हजार घरांचे बांधकाम करीत आहे. या प्रकल्पांत लहान आणि मोठ्या आकाराची घरे आहेत. -  तसेच ही घरे प्राइम लोकेशनमध्ये उभारली जात असल्याने बहुतांश ग्राहकांना या प्रकल्पांतील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे. -  सिडकोने घरांचे मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. परंतु,  सल्लागार नियुक्तीचे हे प्रकरण सध्या राज्य शासनाकडे निवाड्याच्या प्रतीक्षेत आहे. 

टॅग्स :cidcoसिडको