शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

शहरातील मंदिरांत विठूरायाचा जयघोष

By admin | Updated: July 5, 2017 06:44 IST

विठ्ठलाच्या नामघोषात मंगळवारी संपूर्ण नवी मुंबई परिसर विठ्ठलमय झाला. शहरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विठ्ठलाच्या नामघोषात मंगळवारी संपूर्ण नवी मुंबई परिसर विठ्ठलमय झाला. शहरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.टाळ, मृदुंगाचा नाद, विठूनामाचा गजर करत शहरात ठिकठिकाणी अभंग, गवळण, हरिपाठ, भजन, समाजप्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून विठूमाउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात अनेक तरुण स्वयंसेवक कार्यरत होते. नेरुळ, वाशी, सीबीडी-बेलापूर, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरांतील मंदिरांना रोषणाई करण्यात आली होती, तसेच आतील परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. पहाटेपासून अभिषेक, कीर्तन, महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. बेलापूर, करावे, दारावे, घणसोली, वाशी आदी परिसरांतून पंढरपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली होती. नवी मुंबईतून परिसरातून हजारो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी पोहोचले असून, त्यापैकी काही आळंदी ते पंढरपूर वारीतही सहभागी झाले होते. घणसोली येथील संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे पायी दिंडी काढण्यात येत असून, यावर्षीच्या दिंडीत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरोंदा वसाहतीतील आदर्श सोसायटीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक वेशात महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. तर बच्चेकंपनीने सादर केलेले लेझीम खेळ या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. या वेळी उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद साळुंखे, दत्तात्रेय कुंभार, अशोक भिलारे, अजय चव्हाण, सुनील नरलकर, रघुनाथ काठे, फ्रान्सिस डिसोजा, संदीप सावंत, शिवाजी पाटील, राजकुमार बिराजदार, हरिसिंग रावत, श्रीनिवास गरवारे, पांडुरंग पाटील डेरे आदी उपस्थित होते.बाल वारकऱ्यांची दिंडी : बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी पूजन, आरती करून बेलापूर परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठू माउलींचा जयघोष केला. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित व समाजहित जपण्याचा संदेश दिला. संतांचे कार्य विद्यार्थ्यांना कळावे याकरिता दिंडी काढण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, सचिव कृष्णा कोळी, दीपक दिवेकर, मुख्याध्यापक एस. डी. सोनवणे, पर्यवेक्षक अनिल नेहते आदी मान्यवर उपस्थित होते.