शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

मतदानाच्या हक्कासाठी दीड कोटी गेले वाया

By admin | Updated: February 25, 2017 03:15 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली.

आविष्कार देसाई ,  अलिबागरायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली. त्यामुळे त्यांच्यासाठी मतदान प्रक्रियेवर होणारा प्रत्येकी ४० रुपयांप्रमाणे एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविले. मात्र, मतदारांनी त्यांच्या आवाहनला न जुमानल्याने प्रशासानाला आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल १४ लाख ६२ हजार ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सात लाख ३७ हजार १०४ महिला मतदार, तर सात लाख २५ हजार ७९० पुरुष मतदारांचा समावेश आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी सरकार, निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असते. मतदारांना जागृत करण्यासाठी विविध कार्यशाळा, पथनाट्य, मोठमोठे होर्डिंग्ज अशा विविध स्तरांतून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी प्रत्येक मतदारांसाठी ४० रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला होता. त्याप्रमाणे पाच कोटी ८५ लाख १५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये १० लाख ८० हजार २७० मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी चक्क मतदानाला दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यातच जमा आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत सुमारे एक लाख मतदारांना विविध कारणांनी मतदान करता न आल्याने त्यांनी प्रचंड हल्लाबोल केला होता. रायगडातील मतदारांनी मतदानाकडे का पाठ फिरवली याची कारणे प्रशासनाला अभ्यासावी लागणार आहेत. अन्यथा, कोट्यवधी रुपयांच्या निधीचा असाच अपव्यय सुरू राहील.१कार्लेखिंड : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांना आपले मत न देता नोटाचा मोठ्या प्रमाणावर वापर के ल्याचे दिसतआहे. रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०१७ चा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये शेकाप प्रथम क्रमांक तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर विजयी झाली. २अलिबाग मतदार संघातून जिल्हा परिषदेसाठी शेकापला आठ जागा तर शिवसेनेला तीन जागा, काँग्रेस पक्षाला दोन जागा आणि भाजपाला एक जागा मिळाली. लागलेल्या कौलप्रमाणे शेकाप, शिवसेना या दोन पक्षांच्या जागा वाढल्या; परंतु काँग्रेस पक्षाला कच खावी लागली. या निवडणुकांमध्ये अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १,५४,०८१ मतदान झाले तर पंचायत समितीसाठी १,३५,८४९ इतके मतदान झाले आहे. ३असे असले तरी मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना नापसंती देत नोटाचा आकडा वाढला आहे. पंचायत समितीसाठी ३२१९ आणि जिल्हा परिषदेसाठी ३४२५ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानातून उमेदवारांवर नाराजी व्यक्त के ली आहे.