शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 03:55 IST

३४ जिल्ह्यांत उद्या निवडणूक; १७,५१३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २९ फेब्रुवारीला राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून, त्यासाठी मतपेट्या गुरुवारी सर्व ठिकाणी रवाना केल्या आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण राज्यभर निवडणुकीची यंत्रणा राबविली जात आहे. सहा महसूल विभागामधून १२ शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीमधून पाच व्यापारी व एक कामगार प्रतिनिधीची निवड मतदानाने करायची आहे.प्रत्येक महसूल विभागातून दोन सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानकेंद्र तयार करण्यात आले आहे. एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान घेतले जाणार असून, व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदानकेंद्र तयार करण्यात आले आहे.निवडणुकीसाठी मतपेट्यांची पाहणी करून, त्या सर्व मतदानकेंद्रांवर पाठविण्यात आल्या आहेत. यासाठी बाजार समिती मुख्यालयामध्ये निवडणूक यंत्रणा दिवसभर परिश्रम करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर मतदान सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बाजार समितीमध्येही मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राज्यातील ३०५ बाजार समितीचे संचालक हे मतदार असतात. व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी अडते व अ वर्ग खरेदीदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. या वर्षीच्या निवडणुकीसाठी २० हजार नऊ मतदारांची नोंदणी झाली आहे. यापैकी फळ व कामगार मतदारसंघातील निवड बिनविरोध झाली असल्यामुळे येथील २,४३६ जणांचे मतदान होणार नाही. उर्वरित १६ सदस्यांची निवड करण्यासाठी १७,५१३ मतदार मतदानाच हक्क बजावणार आहेत. सर्वात कमी २८१ मतदार कोकण महसूल विभागात असून, सर्वाधिक १,७९९ मतदार भाजीपाला मार्केट मतदारसंघामध्ये आहेत. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती