शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात

By admin | Updated: May 24, 2017 10:07 IST

मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पनवेलमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
भिवंडीत मतदानाच्या बंदोबस्तासाठी जवळपास अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदानाची व्यवस्था पाहत आहेत. श्रीराम हिन्दी हायस्कुल व रईस हायस्कुल मध्े मतदारांचे रांगोळीद्वारे स्वागत करण्यात येत आहे. 
तर दुसरीकडे मालेगाव महापालिकेच्या ८३ जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानास उत्साहात प्रारंभ झाला.  ३७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. काँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे ८३ जागांसाठी मतदान होत आहे. ५१६ मतदान केंद्रांवर तीन हजार ५०० कर्मचाºयांच्या मदतीने मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शहरात अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी प्रथमच चार ड्रोन कॅमेºयांचा वापर केला जाणार आहे.
पनवेलमधील एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महापालिका क्षेत्रात ४ लाख २५ हजार मतदार असून, निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपा-आरपीआय युती, शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना युती व अपक्ष अशी चौरंगी लढत या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील ५७० केंद्रांवर अडीच हजारांवर पोलीस बंदोबस्त आहे. तर चार हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने विविध उपाय राबविण्यात आले असून, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी यंदा प्रथमच सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात पाच याप्रमाणे एकूण १०० विजेत्यांना २५ टक्के करसवलत देण्यात येणार आहे.
भिवंडीच्या २३ प्रभागांतील ९० जागांसाठी होत असलेल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे; पण काँग्रेस, शिवसेना, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट यामुळे निवडणूक बहुरंगी ठरली आहे. भिवंडीत चार लाख ७९ हजार २५३ मतदार आहेत. त्यात दोन लाख ९१ हजार ९९१ पुरुष आणि एक लाख ८७ हजार २६० महिला आहेत. तृतीयपंथी मतदार दोन आहेत. ६३७ बुथ तयार करण्यात आले आहेत.
 
शुक्रवारी मतमोजणी
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगर परिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे देण्यात आली आहेत. त्यात २ हजार २९१ कंट्रोल युनिट; तर ७ हजार १४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.