शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

हलत्या मुखवट्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती; मनपाचा उपक्रम 

By वैभव गायकर | Updated: May 2, 2024 17:33 IST

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उपक्रम राबवले जात आहेत.

वैभव गायकर,पनवेल: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने चार हलते मुखवटे अर्थात शुभंकर (मस्कॉट्स) चार प्रभागांमध्ये पुरविण्यात आले असुन सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील दहा दिवस या मुखवट्यांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यातबाबत आदेशित करण्यात आले आहे.   

पनवेल विधानसभा मतदार संघांतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनूसार पालिकेतील अधिकारी व कर्मचारी  मतदार जनजागृती कार्यक्रम राबवित आहेत. मतदान जनजागृती अभियानाचा भाग म्हणून चार हलते मुखवटे (शुभंकर ) चारही प्रभागांना पुरवण्यात आले आहेत. त्या मुखवट्या सोबत प्रत्येकी दोन माणसे देण्यात आली आहे. प्रभागातील गर्दीच्या ठिकाणी या मुखवट्यांद्वारे मतदार जन जागृती करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुढील दहा दिवस हा कार्यक्रम राबवाविण्यात येणार आहे. 

याचबरोबर आशा सेविकांनी  सेक्टर 1,8,13 नवीन पनवेल, भुसार मोहल्ला,कुंभार वाडा पनवेल, सेक्टर3 खारघर, सेक्टर 19 कामोठे, कळंबोली, साईनगर, तळोजा पाचनंद, आसुडगाव अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती केली.

 तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवारा केंद्र पनवेल, व भीमनगर झोपडपट्टी येथे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच पनवेल तालुक्यातील मालडुंगे, नेरे, ऊसर्ली खुर्द, केवाळे अशा ग्रामीण भागात देखील नागरिकांना आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाpanvelपनवेलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४