शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेड क्षेत्रासह डिजिटल होर्डिंगच्या कामात नियमांना तिलांजली

By नारायण जाधव | Updated: May 14, 2024 21:07 IST

नियमावलीस पायदळी तुडवून शहरात आजही ठिकठिकाणी वाढदिवसाचे बॅनर, कमर्शिअल होर्डिंग झळकत आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात हाेर्डिंग उभारताना जाहिरातदारांनी नगरविकास विभागाच्या होर्डिंग पॉलिसीला तिलांजली देऊन अनेक ठिकाणी नियमबाह्य होर्डिंग उभारली आहेत. यात सीआरझेड क्षेत्रात होर्डिंग असून डिजिटल होर्डिंगचा लख्ख प्रकाश रात्रभर तसाच ठेवणे, असे प्रकार शहरातील ठाणे-बेलापूर, सायन-पनवेल मार्ग, पाम बीच मार्गासह शिवाजी चौक, अरेंजा चौकासह अंतर्गत भागात दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियम उल्लंघनसीआरझेड क्षेत्रात वाशीगांव, पाम बीच मार्ग, ऐरोली-मुलुंड रस्ता, पदपथांवर आणि सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही जाहिरात फलकांना मनाई आहे. तसेच जिथे पदपथ नाही त्या रस्त्यांवर जाहिरातबाजीला मनाई असतानाही ती केली जात आहे. मैदाने, क्रीडांगणे, बगीच्यांसह दोन किंवा अधिक रस्ते एकत्र येतात, त्यांच्या पोचमार्गापासून २५ मीटरच्या आत आता होर्डिंग उभारता येत नाहीत. तरीही अनेक ठिकाणी होर्डिंग उभारले आहेत. या नियमावलीस पायदळी तुडवून शहरात आजही ठिकठिकाणी वाढदिवसाचे बॅनर, कमर्शिअल होर्डिंग झळकत आहेत.

पर्यावरणप्रेमींचाही डिजिटल होर्डिंगला विरोधशहरात ठिकठिकाणी असलेली बिलबार्डसह डिजिटल होर्डिंगची तक्रार पर्यावरणप्रेमींनी महापालिकेसह पर्यावरण विभागाकडे केली आहे. अशा होर्डिंगचा पक्ष्यांसह मानवाच्या डोळ्यांना त्रास होत असून यामुळे वाहनांचे अपघात होत असल्याचा त्यांचा आरोप नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका