शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पदभार स्वीकारताच विजय सिंघल 'अँक्टिव्ह मोड'मध्ये; सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार

By कमलाकर कांबळे | Updated: February 27, 2024 19:47 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

नवी मुंबई : सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून ते अँक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून आले. सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला, तर मंगळवारी देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सादरीकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी थेट विमानतळाच्या जागेवर जाऊन कामाची पाहणी केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मरगळलेल्या सिडकोच्या विविध प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात दक्षिण नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा योजना, मेट्रोचा विस्तार, पंतप्रधान आवास योजना, कार्पोरेट पार्क, नैना क्षेत्राचा विकास, करंजाडे येथील नियोजित स्पोर्ट्स सिटी, नवी मुंबई ते मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा, पारसिक हिलमधून तुर्भे-खारघरदरम्यान बोगदा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, विविध कारणांमुळे ही कामे संथगतीने सुरू आहेत. 

मागील वर्षभरापासून तर ही कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकल्पांची डेडलाईन हुकल्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रकल्पांचा खर्चही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली कामे नियोजित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पदभार स्वीकारताच या सर्व कामांचा सिंघल यांनी आढावा घेण्याचा धडाका लावल्याने मरगळलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सुस्तावलेले अधिकारी सरळ होणार?सिडकोची प्रशासकीय घडी काहीशी विस्कटली आहे. अधिकारी आणि कर्मचारी सुस्तावले आहेत. याचा फटका दैनंदिन कामकाजाला बसला आहे. नागरिकांची कामे होताना दिसत नाहीत. विशेषत: प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. साडेबारा टक्के भूखंड योजना, नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध, सिडकोतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न जटिल बनू लागले आहेत. विजय सिंघल हे शिस्तीचे कडक आहेत. तसेच त्यांचा कामाचा उरकही दांडगा आहे. त्यामुळे सिडकोच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि शिस्त येईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई