शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे वाचले रुग्णांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:34 IST

ऐरोली कोरोना केंद्रातील आग प्रकरण 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री आग लागली. या ठिकाणी ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याने तत्काळ आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टाळली. पाच तासांच्या प्रयत्नानंतर रात्री सव्वाएक वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. विद्युत पुरवठा बंद असल्याने पहिल्या व तिसऱ्या मजल्यावरील रुग्णांची उकाड्यामुळे गैरसोय झाली.नवी मुंबई पालिकेने १३ ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहाचाही समावेश आहे. तीन मजल्याच्या इमारतीमध्ये ३२५ रुग्णांची क्षमता आहे. सध्या केंद्रामध्ये ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजता या केंद्रात शॉकसर्कीट होऊन आग लागली. कर्तव्यावर असणारा विद्युत कर्मचारी आशिष चव्हाणच्या प्रकार निदर्शनास आला. त्याने फायर इस्टींगविशरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. काही क्षणात त्याने आग नियंत्रणात आणली. यामुळे संपूर्ण इमारतीमध्ये आग पसरली नाही. आगीविषयी ऐरोली अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले, परंतु तत्पूर्वी आग विझविण्यात आली होती.आगीमुळे पहिल्या व तिसऱ्या मजल्यावरील विद्युत पुरवठा बंद झाला होता. पालिकेच्या पथकाने जळालेल्या वायर तत्काळ बदलण्याचे काम सुरू केले. रात्री सव्वाएक वाजता सर्व काम पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. 

फायर ऑडिट करण्यात यावेशहरातील सर्व कोरोना रुग्णालयांचे पुन्हा एकदा फायर ऑडिट करण्यात यावे. सर्व केंद्रांमधील विद्युत व्यवस्था सुरळीत आहे का. वायर व इतर विद्युत उपकरणांची तपासणी करण्यात यावी. पुन्हा ऐरोलीसारख्या दुर्घटना होऊ नयेत याची काळजी घ्यावी. सर्व केंद्रांमध्ये आग विझविण्याची जादा यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. दुर्घटना घडल्यास रुग्णांना तत्काळ बाहेर काढण्यासाठीची यंत्रणाही कार्यरत असावी, अशी मागणी होत आहे. आयुक्तांनी स्वत: दिले दक्षरुग्णालयात आग लागल्याचे समजल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठीची कार्यवाही सुरु केली. मनपा आयुक्त अभिजीत बांगर स्वत: अधिकऱ्यांच्या संपर्कात होते. रात्री सव्वाएक वाजता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आयुक्त व कार्यकारी अभियंता हे आढावा घेत होते.

कर्मचाऱ्यांचे कौतुकआशिष चव्हाण याने तत्काळ विझविली. त्याच्या दक्षतेमुळे आग इमारतीमध्ये पसरली नाही. त्याच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यामुळे रुग्णांना काहीही इजा झाली नाही.