शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 07:00 IST

तपासाकरिता दोन पथके; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे

नवी मुंबई : तरुणावर सामूहिक अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत. त्यानुसार दोन पथकांमार्फत पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो परिसर अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांच्या गाठीभेटीचा असल्याने समलैंगिक टोळीचा तो बळी ठरल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.वाशीतील सागर विहार परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय तरुणावर पाच जणांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, अत्याचारानंतर त्यांनी पीडित तरुणाच्या गुदमार्गात नारळ कोंबल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेनंतर तरुणाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले आहेत. परंतु संबंधितांवर गुन्हा दाखल करताना हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात चालढकल झाल्याचा आरोप पीडिताच्या नातेवाइकांकडून होत आहे.सागर विहार परिसरात ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो परिसर प्रेमीयुगुल व समलैंगिक संबंध असणाऱ्यांच्या भेटीचे ठिकाण आहे.केवळ फेरफटका मारण्यासाठी भोवतालच्या परिसरात गेलेला पीडित तरुण त्यांच्या कृत्याचा बळी ठरल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या घटनेनंतरदेखील सागर विहार परिसरात प्रेमीयुगुलांना तसेच गर्दुल्ल्यांना आवर घालण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरत आहेत.पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावेया गुन्ह्याच्या तपासाकरिता पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातून काही महत्त्वाचे सुगावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे लवकरच आरोपींना पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कार