शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील मतदारांची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:22 IST

दुबारसह मृतांची नावे वगळण्यात येणार; नवीन नोंदणीही सुरू

पनवेल : तालुक्यातील नवीन मतदारांनी जास्तीत जास्त मतदान नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आयोगाने नवमतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ४९६ मतदान केंद्रांचा समावेश होता. पनवेलमध्ये ५ लाख १0 हजार २0६ मतदार आहेत. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरी भागात एका यादी भागात १४00 पेक्षा जास्त व ग्रामीण भागात १२00 पेक्षा जास्त मतदार संख्या असतील तर मतदान केंद्राचे विभाजन करण्यास आयोगाने कळविले आहे. त्यामुळे ५६३ मतदान केंद्रे झालेली आहेत. पनवेल तालुक्यात ९९९ दिव्यांग मतदार आढळून आलेले आहेत. त्यामधील ७६१ दिव्यांग मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात आलेली आहे, तसेच उर्वरित दिव्यांग मतदारांची नावनोंदणी करण्याची कारवाई चालू असल्याचे नवले यांनी सांगितले. २३ हजार ५६ मतदारांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहेत. त्यापैकी ३ हजार ४५६ मतदाराचे रंगीत फोटो घेण्यात आले आहेत. भविष्यातील आपली लोकशाही बळकट बनविणे याकरिता भारत निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १0 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य मतदान क्लबची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मतदान आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यामधील व्ही.के. हायस्कूल, डी.ए.व्ही. स्कूल, सी. के. टी. स्कूल नवीन पनवेल, बांठिया स्कूल या चार शाळांची क्लबसाठी निवड केली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत बीएलओ मृत, स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या मतदारांची माहिती संकलित करतील. त्यानंतर संबंधितांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल.मतदार यादीत ज्यांचे नाव व पत्ता चुकला आहे त्यांना दुरुस्ती करता येईल. ही माहिती ईआरओ नेट प्रणालीतून अद्ययावत करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. हे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र २0 जून रोजी बीएलओंना स्वत: सादर करावे लागेल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती सादर करतील. मोहिमेदरम्यान निवडणूक आयोगाचे त्यांच्याकडून दोन रंगीत फोटो घेण्याचे काम सुरु आहे.वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याची शक्यता आहे. मयत असलेले, दुबार नावे व स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल