शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने वाहनांमध्ये बिघाड; सेक्टर ७ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 00:28 IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणी काढले

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नेरूळ येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने अनेकांची वाहने बंद पडल्याचा प्रकार रविवारी घडला. यावरून काहींनी पेट्रोल पंपाच्या टाकीची पाहणी केली असता, पेट्रोलच्या टाकीत शेकडो लीटर पाणी आढळून आले. नागरिकांच्या तक्रारीनंतर मोटर पंपाने हे पाणी बाहेर काढण्यात आले.

नेरूळ सेक्टर सेक्टर ७ येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही बाब उघडकीस आली. सीबीडी येथील आबा कोळेकर हे त्या ठिकाणी दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. मात्र पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावरच त्यांची दुचाकी बंद पडली. दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली दुचाकी अचानक बंद पडल्याने व पुन्हा चालू होत नसल्याने त्यांनी ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेली. या वेळी पेट्रोलच्या टाकीत पेट्रोलऐवजी पाणी आढळून आले. त्याचवेळी इतर दोन दुचाकी त्या ठिकाणी याच कारणामुळे जमा झाल्याचे समोर आले. त्यांनीही त्याच ठिकाणी पेट्रोल भरले होते. यामुळे सर्व जण त्या ठिकाणी गेले असता पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला बाब नाकारली. अखेर वाहनधारकांचा संताप अनावर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाकीतले पेट्रोल तपासले असता, त्यामध्येदेखील पाणी आढळून आले. यामुळे मोटर पंपाद्वारे टाकीतले पाणी उपसले असता शेकडो लीटर पाणी बाहेर निघाले. यावरून त्या ठिकाणी वाहनांमध्ये भरण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये पेट्रोलऐवजी पाणीच होते ही बाब उघड झाली. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत वाहनधारकांनी तक्रार डायरीची मागणी केली. परंतु त्यांना ती देण्यास नकार देण्यात आला. 

प्रकार नजरचुकीने घडल्याचा मॅनेजरचा दावा नवी मुंबईत यापूर्वी अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये भरण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र रविवारी घडलेला प्रकार नजरचुकीने घडल्याचे पंपाचे मॅनेजर संजीव चौधरी यांचे म्हणणे आहे. टँकरमधून पेट्रोलची वाहतूक होताना आग लागू नये म्हणून टँकरमध्ये पेट्रोलसोबत पाणी भरलेले असते. हेच पाणी पेट्रोलसोबत पंपाच्या टाकीत गेल्याने ते वाहनांमध्ये भरले गेल्याचेही सांगत त्यांनी घडल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारात अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून या प्रकरणी कारवाईची मागणी कोळेकर यांनी केली आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल