शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी

By नामदेव मोरे | Updated: July 19, 2024 19:02 IST

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे वाढलेले भाजीपाल्याचे दर कमी होऊ लागले आहेत. वाढलेली आवक व ग्रहाकांनी खरेदीकडे फिरवलेली पाठ यामुळे दर कमी झाले आहेत. फरसबी, शेवगा, वाटाणासासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत.

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे व बाजारभाव वाढलेले असल्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली आहे. ग्राहक कमी असताना आवक अचानक वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. एक आठवड्यापुर्वी ८० ते९० रुपये किलो दराने विकला जाणारा मुळा आता ३० ते ४० रुपयांवर आला आहे. वाटाण्याचे दर १६० ते २०० वरून ७० ते ९० रूपयांवर आले आहेत. फरसबीचे दर ८० ते ९० वरुन ५० ते ५६ रुपयांवर आले आहेत. शेवगा शेंग, दोडका, मिर्ची, कारली, फ्लॉवर यांचे दरही कमी झाले आहेत.

           कोथिंबीर, शेपू, कडीपत्ता, मेथीचे दरही कमी झाले आहेत. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये टाकून दिलेल्या भाजीपाल्याचे ढिग पहावयास मिळत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये विक्रीसाठी नेलेल्या मालामध्येही खराब मालाचे प्रमाण वाढत आहे.

टोमॅटोची तेजी कायमभाजीपाल्याचे दर कमी होण्यास सुरूवात झाली असताना टोमॅटोच्या दरामध्ये मात्र प्रचंड वाढ होत आहे. एक आठड्यापुर्वी बाजार समितीमध्ये २० ते ४२ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमटो आता ६० ते ७० रुपयांवर पोहचला असून किरकोळ मार्केटमध्ये १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दरवस्तू - १२ जुलै - १९ जुलैभेंडी - ३२ ते ५० - १६ ते २६फरसबी - ८० ते ९० - ५० ते ५६फ्लॉवर २० ते २६ - १६ ते २२काकडी २० ते ३६ - १४ ते २२कारले - ४० ते ४६ - २५ ते ३५ढोबळी मिर्ची ३५ ते ४५ - १५ ते २५शेवगा शेंग - ७० ते ९० - ६० ते ८०दोडका ३० ते ३६ - १५ ते २५टोमॅटो - २० ते ४२ - ६० ते ७०वाटाणा - १६० ते २०० - ७० ते ९०मिर्ची ६० ते ८० - २५ ते ६०मुळा ८० ते ९० - ३० ते ४०

पालेभाज्यांचे प्रतीजुडी दरवस्तू - १२ जुलै - १९ जुलैकडीपत्ता - ३० ते ४० - २५ ते ३५कोथिंबीर - २० ते २२ - ८ ते १२मेथी १८ ते २० - १० ते १२पालक १० ते १५ - १० ते १५शेपू १५ ते २० - १० ते १२ 

टॅग्स :Marketबाजार