शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसुंधरा अभियानावर पुन्हा नवी मुंबईचा ठसा; क वर्ग महानगरपालिकांमध्ये पहिला क्रमांक 

By नामदेव मोरे | Updated: June 5, 2023 19:29 IST

सलग तिसऱ्या वर्षी अभियानावर नवी मुंबईने ठसा उमठविला आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. सर्व प्रवर्गांमधील महानगरपालिकांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. सलग तिसऱ्या वर्षी अभियानावर नवी मुंबईने ठसा उमठविला आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त माझी वसुंधरा अभियानातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. मुंबई मधील एनसीपीएमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला क वर्ग महानगरपालिकेमधील पहिला व सर्व मनपा प्रवर्गातील दुसरा क्रमांक देऊन सन्मानीत करण्यात आले. महानगरपालिकेने नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्येही अधुनीक तंत्राचा वापर केला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून खत व इतर वस्तूंची निर्मीती केली जात आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना दिली जात आहे. 

प्लास्टीकविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले जात असून दोन वर्षात २ लाख लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. कमी जागेत जास्त हिरवळ निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचे जंगल तयार करण्यावर भर दिला आहे. रस्ते दुभाजकामध्येही हिरवळ विकसीत केली आहे. बहुतांश सर्व रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शंभूराज देसाई, प्रवीय दराडे उपस्थित होते. आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

मियावाकी जंगल - महानगरपालिकेने कोपरखैरणेतील निसर्ग उद्यानात मियावाकी पद्धतीने ६२ हजार वृक्षा लावले आहेत. ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे १ लाख २३ हजार वृक्ष लावले आहेत.

शहरात ३९ टक्के हरीत क्षेत्रमनपा कार्यक्षेत्रामध्ये उद्याने, हरित पट्टे, दुभाजक व मोकळ्या भूखंडावरील वृक्षारोपणाचा आकडा २२५ पेक्षा जास्त आहे. प्रत्येक विभागात उद्याने विकसीत केली आहेत.ई वाहनांना प्रोत्साहन - महानगरपालिका परिवहन उपक्रमात १८० इलेक्टीक बसेसचा समावेश आहे. शहरभर युलू ई बाईक उपलब्ध करून दिल्या आहेत. २० ठिकाणी चार्जींग स्टेशनची सुविधा उपलब्ध केली जात आहे.प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग - शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्याने व एमआयडीसीतील उद्योगासाठी उपयोग केला जात असून अशाप्रकारे पाण्याचा उपयोग करणारी नवी मुंबई एकमेव मनपा आहे.

प्रतिक्रिया - महानगरपालिकेला क वर्गात प्रथम व सर्व प्रवर्गातील दुसरा क्रमांक मिळाला आहे. हा बहुमाण पर्यावरण प्रेमी नवी मुंबईकरांच्या सातत्यपूर्ण कामाचे फलीत असून हा पुरस्कार सर्व नागरिकांना समर्पीत करत आहोत. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका