शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशीचे पासपोर्ट कार्यालय कागदावरच; कार्यालयासाठी आवश्यक सुविधांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:55 IST

वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.पासपोर्ट विभागाकडून वाशीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे येथे दररोज शंभरच्या वर नागरिक पासपोर्टच्या चौकशीसाठी येत आहेत. अशावेळी पोस्टाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागत आहे.पासपोर्ट काढण्यासाठी होणारी पायपीट टाळण्यासाठी नवी मुंबईतही पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून गतवर्षी देशभरात मंजूर झालेल्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये नवी मुंबईचाही समावेश केला गेला.राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या प्रचारामुळे पासपोर्ट संबंधी चौकशीसाठी नागरिकांची पोस्ट कार्यालयात गर्दी वाढली आहे.यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांकडून तिथला पासपोर्ट कार्यालयाचा बोर्ड देखील काढून ठेवण्यात आला होता. मात्र, राजकीय दबावानंतर तो पुन्हा लावण्यात आला. पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोस्टाच्या कार्यालयातील ज्या जागेचा वापर करण्यात आला, ती पोस्ट कर्मचाऱ्यांच्या बैठकीची जागा आहे.उद्घाटनाच्या दिवशी रविवारी सुट्टी असतानाही काही कर्मचाºयांना बोलावून एक दिवसासाठी तिथले सामान हटवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पोस्ट कर्मचाºयांकडूनच त्या जागेचा वापर होत असल्याने, पासपोर्ट कार्यालयासाठी अद्याप जागाच निश्चित झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.नवी मुंबईत पासपोर्ट कार्यालयाची केवळ घोषणा झालेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे नवी मुंबईत अद्याप अधिकृतपणे पासपोर्ट कार्यालय सुरू झालेले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर यासंबंधीच्या प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षित आहे. - हरीश फुलपडिया, उपविभागीय अधिकारी-पासपोर्ट विभाग

टॅग्स :passportपासपोर्ट