शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये अज्ञात चौकडीने ओला कार चालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:41 IST

अज्ञात चौकडीने नेरूळ येथून उलवे येथे जाण्याच्या बहाण्याने ओला कारची बुकिंग करून सदर कार चालकाला पनवेलमधील निर्जन भागात नेऊन त्याला बेदम

पनवेल : अज्ञात चौकडीने नेरूळ येथून उलवे येथे जाण्याच्या बहाण्याने ओला कारची बुकिंग करून सदर कार चालकाला पनवेलमधील निर्जन भागात नेऊन त्याला बेदम मारहाण करून त्याच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह, दोन मोबाइल फोन, कारमधील टॅब व इतर ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलिसांनी या चौकडीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.या घटनेतील तक्रारदार ओला कार चालकाचे नाव अकबर अली अजगर अली शेख (२४) असे असून तो गोवंडी भागात रहाण्यास आहे. अकबर अली हा त्याच्या गावातील ओळखीचे मिराज खान यांची स्विफ्ट डिझायर कार ओला कंपनीच्या वतीने भाड्याने चालवितो. अकबर हा ओला कंपनीचे भाडे घेऊन अंधेरी येथून नेरु ळ येथे आला होता. त्यानंतर तो पुन्हा भाड्याच्या प्रतीक्षेत असताना, त्याला ओला कंपनीकडून उलवे नोड येथे जाण्यासाठी भाडे मिळाले. त्यानुसार चौघे तरु ण त्याच्या कारमध्ये येऊन बसले. त्यानंतर चालक अकबर अली हा त्यांना घेऊन उलवेच्या दिशेने जात असताना, कारमध्ये बसलेल्या चौघा प्रवाशांनी मध्येच कार थांबवून उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे अकबरने त्यांच्याकडे १0८ रुपये भाड्याची मागणी केल्यानंतर त्यांनी भाडे देण्यास नकार दिला. मात्र त्यांना तीन चार किलोमीटर दूरवर असलेल्या घरापर्यंत सोडल्यास त्याला भाडे देण्याचे कबूल केले. त्यामुळे अकबर अली त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यास तयार झाल्यानंतर त्या चौघा तरुणांनी अकबरला ९ ते १0 किलोमीटर दूरवर निर्जन स्थळी नेऊन कार चालक अकबरच्या पोटावर चाकूसारखे हत्यार लावून त्याला जबरदस्तीने पाठीमागील सिटवर बसविले. त्यानंतर त्यातील एकाने कार चालविण्यास सुरुवात केली. या दरम्यान पाठीमागे बसलेल्या दोघा तरुणांनी अकबरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर रक्तबंबाळ झाल्यानंतर चौघा तरुणांनी त्याच्याजवळ असलेली ५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल फोन, कारमध्ये असलेला टॅब लुटून त्या ठिकाणावरून पलायन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या अकबरने आपली कार त्याच ठिकाणी सोडून प्रथम कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्र ार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी चौघा अज्ञात लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.