नवी मुंबई : वाशीत उभी असलेली रिक्षा जाळण्याचा अज्ञाताने प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. घरालगत ही रिक्षा उभी असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. परंतु ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी रिक्षावर पाणी ओतून आग विझवल्याने हानी टळली.वाशी सेक्टर ५ येथे राहणाऱ्या प्रशांत गायकवाड यांच्या रिक्षासोबत हा प्रकार घडला आहे. गायकवाड यांनी राहत्या परिसरात त्यांची रिक्षा (एमएच ४३ एसी ५३०१) उभी केली होती. यावेळी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या रिक्षाच्या हुडला आग लावली. परंतु रिक्षा पेटत असल्याचे वेळीच निदर्शनास येताच रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य हानी टळली. सदर परिसरात यापूर्वी देखील वाहने जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने पेटवणाऱ्या समाजकंटकांविरोधात रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
वाशीत रिक्षा जाळली
By admin | Updated: April 7, 2016 01:26 IST