शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याचा केला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 02:22 IST

पोलीस तपासात निष्पन्न । बांगलादेशी घरजावयाचा प्रताप

मयूर तांबडे

पनवेल : बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेला शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरॉक्स काढून त्याच्यावर स्वत:चे नाव टाकून घरजावई बनण्याचा प्रताप या बांगलादेशीने केल्याचे समोर आले आहे.

चिखले गावात घरजावई म्हणून राहत असलेला इनामुल मुल्ला हा मनोहर राहू पवार या नावाने वावरत होता. त्याच्या नावावर चिखले येथे घरदेखील आहे. त्याला पारस आणि श्लोक नावाची दोन मुले असून, ती कोन येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. या बांगलादेशीकडे म्हणजेच मनोहर राहू पवार याच्याकडे बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र सापडून आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याचा गुन्हा दाखल करून शासकीय कार्यालयांना पत्रे लिहून त्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार चिखले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने तो शाळा सोडल्याचा दाखला शाळेने दिला नसल्याचे तालुका पोलिसांना सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेने मनोहर पवार (ईनामुल मुल्ला) याची पत्नी त्याच शाळेत शिकलेली असल्याने त्याच्या पत्नीला शाळा सोडल्याचा दाखला दिला होता. त्याचा गैरवापर करून इनामुल याने त्याची झेरॉक्स काढून त्यावर व्हाइटनर लावले व स्वत:चे नाव टाकले होते. ग्रामपंचायतने मनोहर पवारच्या नावावर असलेल्या घराची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने हे घर विकत घेतलेले आहे. तर रेशनकार्ड काढण्यासाठी देण्यात आलेल्या अ‍ॅफिडेव्हिटवर चिखले गावातील एका इसमाने मनोहर राहू पवार याला ओळखतो म्हणून सही केलेली आहे.देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणीघर जावई म्हणून राहणारया ईनामूल उमर मुल्ला उर्फ मनोहर राहू पवार याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या व त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाºया व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पनवेल मनसेने केली आहे. तसे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल