नवी मुंबई : स्वच्छ आणि स्मार्ट शहराची ओळख असलेल्या नवी मुंबईतील सुविधाही आता तितक्या स्मार्ट होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवीन वर्षातील पहिल्याच आठवड्यापासून एक नवीन उपक्रम राबविला जात आहे. स्वाच्छ शहराच्या या अपक्रमात सोशल मीडियाचा वापर करुन नागरिकांना आता 9769894944 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर स्वच्छतेविषयीची तक्रार/सूचना नोंदविता येणार आहे. मागील वर्षभर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच नागरिकांना सुलभ होतील व शहर स्वच्छतेत भर घालतील अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच अनुषंगाने नववर्षाच्या पहिल्यात आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या २४ व्या वर्धापनिदनाचे औचित्य साधून सध्याची जनमानसांमधील सोशल मिडीया त्यातही विशेषत: व्हॉट्सअॅप वापराची लोकप्रियता लक्षात घेता महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहर स्वच्छतेसाठी 9769894944 हा व्हॉट्सअॅप मोबाईल क्र मांक नागरिकांच्या सोयीसाठी १ जानेवारीपासून सुरू केला आहे. नागरिक या क्र मांकावर आपल्या स्वच्छतेविषयीच्या तक्र ारी, मौल्यवान सूचना छायाचित्रांसह पाठवू शकतात अशी माहिती देत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी यामधून नागरिकांना अपेक्षति आवश्यक ठिकाणी अधिक तत्पर व समाधानकारक सेवा उपलब्ध होईल आणि याव्दारे शहर स्वच्छता कार्यास गतिमानता येईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाय ही व्हॉटसअॅप सेवा २४ बाय ७ उपलब्ध असणार असल्याने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कृतिशीलता वाढीस लागणार आहे.शहर स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून व्हॉट्सअॅप मोबाइल क्र मांक सुविधेमुळे शहरातील स्वच्छतेवर आणखी भर देऊन स्वच्छ शहराची संकल्पना सत्यात उतरविली जाणार आहे. ओला व सुका कचऱ्याचे नागरिक पातळीवरच वर्गाकरण व्हावे ही भूमिका असून यादृष्टीने शहरातील काही मोठ्या सोसायट्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात कचरा वर्गीकरण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र यात सर्वांचाच व्यापक सहभाग अपेक्षति असून इतरही सोसायट्या, वसाहतींनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेने ओला व सुका कचरा निर्माण होतो तिथेच म्हणजे नागरिक पातळीवरच वर्गीकृत करावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले आहे.
स्वच्छतेसाठी सोशल मीडियाचा वापर
By admin | Updated: January 4, 2016 02:07 IST