शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

शहरी भागातील अतिक्रमणांना अभय?

By admin | Updated: August 13, 2015 23:38 IST

दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर सिडकोने अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईदीड महिन्याच्या विश्रांतीनंतर सिडकोने अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. असे असले तरी सिडकोच्या कारवाईवर पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले आहेत. सिडकोकडून नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांना लक्ष्य केले जात असून शहरी भागातील अतिक्रमणांना अप्रत्यक्षपणे अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक करवाई सुरू केली आहे. याअंतर्गत गाव - गावठाणातील फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांभोवती कारवाईचा पाश आवळला जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांत सिडकोविरोधात संतापाची लाट पसरली आहे. न्यायालयाने शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करून कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे गाव - गावठाणातील बांधकामांबरोबरच शहरी भागातील अतिक्रमणांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. सिडकोकडून मात्र फक्त प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांना टार्गेट केले जात आहे. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने विविध उत्पन्न गटांसाठी घरे बांधली आहेत. विशेषत: अल्प उत्पन्न घटकांसाठी बांधलेल्या बैठ्या चाळींतून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. निचे दुकान, उपर मकान या संस्कृतीमुळे बहुतांशी चाळीचे रूपांतर टुमदार इमारतीत झाले आहे. छोट्याशा चाळीच्या जागेवर दोन ते तीन मजल्यांच्या निमुळत्या इमारती उभारल्या आहेत. तळमजल्यावर दुकाने आणि वरचे मजले भाडेकरूंना दिल्याने परिसरातील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. कोपरखैरणे, वाशी, ऐरोली तसेच नेरूळ परिसरांतील बहुतेक बैठ्या चाळीतून अशाप्रकारे बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे. पामबीच मार्गावरील अनेक इमारतीतून अतिरिक्त एफएसआय वापरण्यात आला आहे. एफएसआयची चोरी करून अतिरिक्त बांधकामे करणाऱ्या या मार्गावरील जवळपास ३०० इमारतींवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र त्यावर कारवाई होत नाही. शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांतून अतिक्रमण झाले आहे. पार्किंगच्या जागा बळकावून त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांवर मात्र धडक कारवाई केली जात आहे. केवळ कारवाईचा आकडा गाठण्यसाठी सिडको व महापालिकेकडून कारवाईचा फार्स रचला जात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांंनी केला आहे.