शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या पागोटे-कुंडेगाव खाडीत मृत माशांचा खच: कंपन्यांतील रसायन मिश्रित सांडपाणी समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 20:54 IST

वारंवार घडणाऱ्या प्रकाराकडे प्रदुषण विभागाचे दुर्लक्ष: मच्छीमार संतप्त

मधुकर ठाकूर 

उरण: तालुक्यातील पागोटे-कुंडेगाव खाडीत गुरुवारी (१५)  हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले आहेत.परिसरातील कंपन्यांमधुन सातत्याने रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी समुद्र आणि खाडीत सोडण्यात येत असल्यानेच मासे मृत होत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून केला जात आहे.

उरण तालुक्यात अनेक लहान-मोठ्या खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये दुय्यम प्रकारची मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते.परिसरातील शेकडो स्थानिक मच्छीमार या खाड्यांमध्ये मासेमारी करून आपल्या कुटुंबियांची उपजीविका करीत असतात. मात्र द्रोणागिरी परिसरात असलेल्या खाडी, समुद्र किनाऱ्यावर अनेक कंपन्या,गोदामे उभारण्यात आली आहेत.या कंपन्या, गोदामातून सातत्याने रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी समुद्र आणि खाडीत सोडण्यात येत आहे. रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करताच थेट समुद्र, खाड्यात सोडण्यात येत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होते.

खाड्या, समुद्रातील दुषित होत असल्यानेच मासे मृत होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.गुरुवारीही (१५) पागोटे-कुंडेगाव येथील खाडीत हजारो मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले आहे.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.मात्र रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करताच थेट समुद्र, खाड्यात सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यानेच वारंवार मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी केला आहे.तर संतप्त झालेल्या येथील स्थानिक मच्छीमारांनीही प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच दोष दिला आहे.  

याप्रकरणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन समुद्र, खाडी किनाऱ्यावर जाऊन पाहणी केली आहे.पाहणी अहवालानंतर कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणFishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई